Bigg Boss फेम अभिनेत्याला अटक! अटकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल… नक्की काय आहे प्रकरण?
Bigg Boss : बिग बॉस फेम अभिनेत्याला पोलिसांनी का केली अटक? अटकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल... जाणून घ्या नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण?

Bigg Boss : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता प्रिन्स नरुला याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, गुरुवारी प्रिन्स अचानकच चर्चेत आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस प्रिन्स याला अटक करताना दिसत आहेत. असं सांगण्यात येत आहे की, प्रिन्स याला दिल्ली मशीद वादामुळे अटक करण्यात आली आहे. पण असं काहीही नसून व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य समोर येत आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रिन्स नरुला याने त्या मागचं सत्य सांगितलं आहे. अभिनेत्याचा व्हिडीओ शुटिंग दरम्यानचा आहे. प्रिन्स म्हणाला, ‘तो व्हिडिओ एका ब्रँडच्या शूटचा भाग होता. मला अटक झालेली नाही.’ प्रिन्स याच्या अटकेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली… पण प्रिन्स याला अटक झाली नसल्याचं कळल्यानंतर चाहत्यांनी देखील मोकळा श्वास घेतला.
Delhi Police detains influencer Prince Narula for allegedly spreading false claims about a mosque demolition to provoke unrest.#Princenarula #FukraInsaan #MunawarFaruqui #LaughterChefs pic.twitter.com/NDjcYyJjiw
— Abhishek Raosahab (@abhi_r_ydv07) January 8, 2026
एका व्हायरल व्हिडिओमध्ये प्रिन्स काही पोलिस अधिकाऱ्यांसोबत दिसत होता. मात्र, त्याच्या अटकेचं खरं कारण स्पष्ट झालं नाही, ज्यामुळे त्याच्याविरुद्ध अनेक अफवा पसरल्या. प्रिन्सच्या चेहऱ्यावरही काहीशी चिंता दिसून येत होती, तो त्याच्या अटकेमुळे अस्वस्थ दिसत होता. त्याच्या चाहत्यांनी व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी एआय टूल्सचा वापर केला. यावरून हे उघड झाले की व्हिडिओ बनावट किंवा दिशाभूल करणारा आहे.
सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा प्रिन्स वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. “रोडीज” या शो दरम्यान प्रिन्स एल्विश यादवशी भांडताना दिसला, ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली. प्रिन्स त्याच्या आक्रमक स्वभावासाठी देखील ओळखला जातो. अनेकांना त्याचा बिनधास्त अंदाज प्रचंड आवडतो.
प्रिन्स याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने गर्लफ्रेंड युविका चौधरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. काही काळापूर्वी प्रिन्स आणि युविका यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु दोघांनी त्या केवळ अफवा असल्याचे सांगत त्या फेटाळून लावल्या.
