मुलींच्या मेसेजने वैतागला प्रणित मोरे; थेट केला मोठा खुलासा, म्हणाला मेल करत..
प्रणित मोरे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रणित हा बिग बॉस हिंदी सीजन19 मध्ये धमाका करताना दिसला. टॉप थ्रीपर्यंत पोहोचण्यात प्रणितला यश मिळाले. आता त्याने मोठा खुलासा केला.

बिग बॉस हिंदीमध्ये प्रणित मोरे हा धमाका करताना दिसला. टॉप थ्रीपर्यंत त्याने मजल मारली. प्रणित मोरे हाच बिग बॉस 19 चा विजेता होईल, असे सांगितले जात होते. प्रेक्षक त्याला प्रचंड प्रेमही देत होते. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात अत्यंत शांतपणे त्याने गेम खेळला. भारतीय क्रिकेटर दिपक चहर याची बहीण मालती चहर ही बिग बॉसच्या घरात प्रणितची जवळची मैत्रिण होती. मात्र, शेवटी दोघांमध्ये वाद झाले. शेवटपर्यंत प्रणित तिला मैत्रिण मानत. मात्र, बिग बॉसमधून बाहेर येताच मालतीचे प्रणितबद्दलचे विचार बदलले. अत्यंत कष्ट करून प्रणितने वेगळे ओळख मिळवली. अनेकदा सलमान खान याच्यावरही कॉमेडी करताना प्रणित दिसला. त्यावरून बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर सलमान खान याने त्याचा चांगलाच समाचार घेतला. सध्या प्रणित मोरे हा चांगलाच चर्चेत आहे.
नुकताच प्रणित मोरे याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अत्यंत मोठा खुलासा केला. प्रणित मोरे याने सांगितले की, त्याला मुली सतत मेसेज करत आहेत. मुलींचे खूप जास्त मेसेज सध्या त्याला येत आहेत. हद्द म्हणजे मुली त्याला थेट लग्नासाठी बायोडाटाही शेअर करत आहेत. प्रणित म्हणाला की, मला गेल्या काही दिवसांपासून मुलीचे खूप जास्त मेसेज येत आहेत.
मला इतके जास्त मेसेज येत आहे की, काय सांगू.. फक्त मेसेजच नाही तर मला मुली मेलही करत आहेत. मला एका मुलीचा बायोडाटा आला आणि माझी आई खूप जास्त आनंदी झाली. मुलींचे मेसेज येण्याचे प्रमाण वाढले आहे. पण मला मनातून वाटते की, कामाच्या ठिकाणी या गोष्टी नको. त्यामध्येच मी शोमध्येही लव्ह अॅंगलने खेळणे पूर्णपणे टाळले किंवा मी तसे काही केले नाही.
लोक माझ्या कामाला ओळखतात, असेही प्रणित मोरे याने म्हटले. बिग बॉस 19 सीजनमध्ये दाखल झाल्यानंतर प्रणित मोरे याची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढल्याचे बघायला मिळाले. प्रणित याला बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर नक्कीच एक वेगळी ओळख मिळाली आहे. प्रणित मोरे बिग बॉस मराठीमध्येही दाखल होऊ शकतो, अशी एक जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
