AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं…’, आगरी भाषेत निक्की तांबोळीने विनायक माळीसाठी घेतला खास उखाणा

Nikki Tamboli: आगरी भाषेत निक्की तांबोळीने प्रसिद्ध यूट्यूबर विनायक माळीसाठी घेतला उखाणा, खास अंदाजात उखाणा घेत म्हणाली, 'चांदीच्या वाटीच मटणाचं तुकडं...', सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

'चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...', आगरी भाषेत निक्की तांबोळीने विनायक माळीसाठी घेतला खास उखाणा
फाईल फोटो
| Updated on: May 04, 2025 | 9:56 AM
Share

Nikki Tamboli: अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार निक्की तांबोळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये निक्की अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अधिक चर्चेत आली. आता देखील निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निक्कीने विनायक माळीसाठी खास उखाणा घेतला आहे. निक्कीने विनायक माळीसाठी आगरी भाषेत उखाणा घेतला आहे. खास अंदाजात उखाणा घेत निक्की तांबोळी म्हणाली, ‘चांदीच्या वाटीत मचणांचं तुकडं…. घास भरवते मेल्या तोंड कर इकडं…’ सध्या निक्कीने विनायकसाठी घेतलेला उखाणा सर्वत्र चर्चेत आहे.

निक्कीने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात निक्कीने विनायक याच्यासाठी उखाणा घेतला. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘दादूस… पूर्ण शो गाजवणर आगरी कोळी ऑन फायर…’ अन्य एक चाहता म्हणाला, ‘उखामा एकदम भारी…’ अशा कमेंट्स सध्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाबद्दल सांगायच झालं तर, कार्यक्रमात सेलिब्रिटी वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसणार आहेत. कार्यक्रमाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कार्यक्रमात मराठी कलाविश्वातील अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार आणि सोशल मीडिया स्टार दिसणार आहे.

‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात निक्की तांबोळी आणि विनायक माळी यांच्यासोबत मधुराणी गोखले, रुपाली भोसले, आशिष पाटील, माधुरी पवार आणि गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि इतर कलाकार देखील दिसणार आहे. कार्यक्रमाच्या होस्टची जबाबदारी अभिनेता अमेय वाघ याच्या खांद्यावर आहे. महत्त्वाचं म्हणजे, सेलिब्रिटींना बनवलेल्या पदार्थांचं परीक्षण देखील केलं जाणार आहे. यासाठी सेलिब्रिटी शेफ जयंती कठाळे मुख्य भूमिकेत आहेत.

Follow Us
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत