‘बिग बॉस’च्या घरात भांडणे का होतात? स्क्रिप्टेड असतं की खरं? या अभिनेत्याने केला खुलासा
बिग बॉसच्या घरातील भांडणे स्क्रिप्टेड आहेत की खरी? याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. त्याबद्दल एका अभिनेत्याने स्पष्टपणेच खुलासा केला आहे. त्या अभिनेत्याने बिग बॉस 10 मध्ये जो काही अनुभव घेतला त्यावरून त्याने हे सत्य सांगितलं आहे.

सध्या प्रेक्षकांना आतुरता आहे ती ‘बिग बॉस 19’ची जेव्हापासून ‘बिग बॉस 19’चा टीझर लाँच झाला आहे तेव्हापासून सर्वांना या शोची उत्सुकता लागली आहे. यावेळी बिग बॉसमध्ये काय नवीन थीम असणार आहे. आणि स्पर्धकांना कोणत्या चॅलेंजेसना समोर जावं लागणार आहे. हे पाहणं सर्वांसाठीच उत्सुकतेचं राहणार आहे. पण जेव्हा जेव्हा बिग बॉस सुरु होतं तेव्हा प्रेक्षकांना पडणारा प्रश्न एकच आहे की बिग बॉसच्या घरात जो काही ड्रामा चालतो किंवा जे काही भांडणं होतात ते स्क्रिप्टेड असतात की खरंच ती परिस्थिती असते. याबाबत आता एका अभिनेत्याने खुलासा केला आहे.
‘बिग बॉस’मध्ये लोक का भांडतात?
हा अभिनेता म्हणजे विक्रांत सिंग राजपूत. तो एक भोजपुरी अभिनेता असून ‘बिग बॉस 10’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. त्याने शो दरम्यानचा त्याचा अनुभव शेअर केला आहे. ‘बिग बॉस’मध्ये लोक का भांडतात याबद्दलही त्याने सांगितले आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाचे नाव भोजपुरी व्यतिरिक्त हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टी आवडणाऱ्या प्रेक्षकांना माहिती आहे. ‘बिग बॉस 10’ मध्ये स्पर्धक म्हणून आल्यावर तिचा पती विक्रांत सिंग राजपूत खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याने अनेक भोजपुरी चित्रपट केले आणि आज तो एक हिट अभिनेता बनला आहेत. विक्रांत सिंग राजपूतने ‘बिग बॉस’ मध्ये खूप अनुभव मिळाला, ज्याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
बिग बॉसमध्ये सर्वकाही स्क्रिप्टेड असतं का?
जेव्हा विक्रांतला विचारण्यात आले की बिग बॉसमध्ये सर्वकाही स्क्रिप्टेड असतं का?, तेव्हा विक्रांतने कोणताही संकोच न करता हे उत्तर दिलं. तो म्हणाला “नाही, ते स्क्रिप्टेड नसतं, पण तिथे परिस्थिती अशी निर्माण केली जाते की तुम्हाला इच्छा नसतानाही भांडावं लागतं. जर तुम्ही शांत बसून लढायला नाही म्हटले तर कोणीही तुम्हाला आवडणार नाही आणि मते न मिळाल्याने तुम्हाला बाहेर काढले जाईल. तिथे जे बोलतात, लढतात आणि सक्रिय राहतात त्यांचच वर्चस्व असतं.”
View this post on Instagram
“तिथे सगळेच अनावश्यक गोष्टींवरून भांडायला लागतात”
विक्रांत पुढे म्हणाला, “तिथे सगळेच अनावश्यक गोष्टींवरून भांडायला लागतात आणि हो, मी तिथून एक गोष्ट शिकलो की तुम्हाला खूप संयमाने लढावं लागतं, शिवीगाळ किंवा हाणामारी न करता.” तो हसून पुढे म्हणाला की, “भाऊ, हे आम्हा बिहारींसाठी थोडे कठीण होतं”
या शोमध्ये मोनालिसासोबतची जवळीक वाढली
विक्रांतने सांगितले की बिग बॉस त्याच्यासाठी भाग्यवान ठरला कारण या शोद्वारे तो मोनालिसाला अधिक ओळखू लागला, त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शो दरम्यानच विक्रांतने मोनालिसासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि शोमध्ये त्यांची केमिस्ट्री देखील खूप छान दिसून आली. विक्रांतने 2017 मध्ये मोनालिसासोबत लग्न केले. त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमधून त्यांच्यात किती प्रेम आहे हे नक्कीच दिसून येतं. 2015 मध्ये विक्रांतने भोजपुरी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आणि त्याचा पहिला चित्रपटामध्ये मोनालिसाचं अभिनेत्री होती. तेव्हापासूनच त्यांचं प्रेम सुरु झालं.
