
‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसणार का, यावर गौरव म्हणाला, ‘मी अद्याप काही विचार केलेला नाही. खऱ्या विश्वात मी अद्याप आलेलो नाही… माझा फोन देखील बंद आहे. तीन महिने झाले बिल देखील भरलं नाही… त्यामळे थोडं नॉर्मल झाल्यानंतर पुढे काय करायचं याचा निर्णय घेता येईल…’ असं देखील गौरव खन्ना म्हणाला.
गौरव खन्ना म्हणाला, ‘बक्षीसाची रक्कम अजून आलेली नाही, पण जेव्हा ती येईल तेव्हा आम्ही ती हुशारीने गुंतवू. वायफळ खर्च बिलकूल करणार नाही आणि तुम्ही देखील करु नका…कारण ही कष्टाने कमावलेली रक्कम आहे.’
‘तू देखेंगी और फिनाले में खड़ी होकर तालियां बजाएंगी मेरे लिए… तू पहचानी जाएगी कि तू मेरे शो में आई थीं…’, ‘बिग बॉस 19’ ची रनरअप ठरलेल्या फरहाना भट्ट हिला एका टाक्स दरम्यान गौरव खन्ना याने असं म्हटलं होतं आणि 7 डिसेंबर रोजी तेच चित्र सर्वांना दिसलं…
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपैकी गौरव खन्ना हा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक होता. त्याने दर आठवड्याला सुमारे १७.५ लाख रुपये मिळाले होते. त्याने 14 आठवड्यात 2.45 कोटी रुपयांची कमाई केली होती. ती पर एपिसोड 205 लाख रुपये घेत असे.
बिग बॉस 19मध्ये टॉप पाच स्पर्धकांमध्ये स्थान पटकावणारा मराठमोळा प्रणीत मोरे आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. प्रणीत सलमान खानच्या किक 2 सिनेमात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
Bigg Boss 19 : फरहाना म्हणाली, मला असं वाटतं की शोमध्ये गौरव याचा कुठेच सहभाग नव्हता… मला माहिती नाही, प्रेक्षक कोणत्या नजरेने शो बघत होते.. गौरव कायम सेफ खेळला… आपल्या वागणुकीमुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली… त्यामुळे मला असं वाटतं की गौरव ट्रॉफीच्या लायक नव्हता… असं फरहाना भट्ट म्हणाली.
Bigg Boss 19 : सेलिब्रिटींवर सतत विनोद करत असलेल्या प्रणित मोरे याला अभिनेता सलमान खान याने ओरडल्यानंतर प्रणित म्हणाला, ‘पुन्हा कधीच अशी कॉमेडी करणार नाही…’
Bigg Boss 19 ची ट्रॉफी जिंकताच गौरव खन्ना याने पहिली पोस्ट केली आहे. गौरव याने पत्नीसोबत देखील फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेता आनंदी दिसत आहे.
Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ मुळे फरहाना हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. शो संपल्यानंतर फरहाना म्हणाली, ‘या सिझलना लोक माझा सीझन सांगतील…’ असं फरहाना म्हणाली.
बिग बॉस 19 चा फिनाले झाला असून गाैरव खन्ना हा बिग बॉस 19 चा विजेता झाला आहे. फरहाना भट्ट आणि गाैरव खन्ना बिग बॉस 19 चे टॉप 2 फायनलिस्ट ठरले होते. अखेर विजेतेपदाची माळ गाैरवच्या गळ्यात पडली.
बिग बॉस 19 ला गाैरव खन्ना आणि फरहाना असे दोन टॉप फायनलिस्ट मिळाले असून दोघांपैकी एकजण विजेता होईल. वोटिंग लाईन 10 मिनिटांसाठी सुरू झाल्या आहेत. त्यानंतर बिग बॉस 19 चा विजेता जाहीर होईल.
बिग बॉस 19 चा फिनाले सुरू असून प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. गाैरव खन्ना आणि फरहाना खान हे दोन फायनलिस्ट बिग बॉस 19 मिळाली आहेत.
बिग बॉस 19 चा फिनाले सुरू असून यावेळी अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी सलमान खान भावूक झाल्याचे बघायला मिळाले. फक्त भावूकच नाही तर सलमान खान सेटवरच ढसाढसा रडला…
बिग बॉस 19 चा फिनाले सुरू असून आता बिग बॉसला टॉप 3 फायनलिस्ट मिळाले आहेत. गाैरव खन्ना, फरहाना खान आणि प्रणित मोरे बिग बॉस 19 चे फायनलिस्ट ठरले आहेत.
तान्या मित्तल हिला मोठा झटका बसला असून ती बिग बॉस 19 च्या घराबाहेर पडली आहे. फिनालेच्या दिवशीही सलमान खान तान्याचा क्लास लावताना दिसला.
सनी लिओनी आणि करण कुंद्रा “स्प्लिट्सव्हिला 16: च्या प्रमोशनसाठी आले होते. त्यांनी अशनूर आणि अभिषेक यांना स्टेजवर आमंत्रित केले. अशनून सलमानला सांगतो, मला चुकीच्या मुली मिळाल्या आहेत..
बिग बॉस 19 च्या घरातून अमान मलिक हा बाहेर गेला आहे. आता बिग बॉसला त्यांचे टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत.
बिग बॉस 19 च्या ग्रॅंड फिनालेला सुरूवात झाली असून एक एक स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहेत. रिपोर्टनुसार, प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
सलमान खानने विचारला थेट प्रणित मोरे याच्या आई वडिलांना प्रश्न. सलमान खान म्हणाला कधी याला मारण्याची इच्छा झाली नाही का? जुन्या आठवणी काढत सलमान खान म्हणतो की, माझ्याबद्दल कशाला बोलतो हा.. त्यावर बोलताना प्रणितची आई म्हणाली, सर जुन्या गोष्टी आहेत, माती टाका…
बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात असून मालती चहर आणि शहवाज यांच्यात वाद सुरू झाला असून मालती हिने सलमान खान याच्याकडे तक्रार केला.
बिग बॉस 19 च्या घरात दिपक चहर याची बहीण मालती आणि प्रणित मोरे यांची चांगली मैत्री बघायला मिळाली. मात्र, मालती घरातून बाहेर जाताना प्रणितला अजिबातच बोलली नाही. यावरून सलमान खान बोलताना दिसला.
बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात झाली असून यावेळी सलमान खान प्रणित मोरे याच्यासोबत मराठीत संवाद साधताना दिसला. तू बाहेर ये मी तुझी वाट पाहत आहे, असे सलमान खान याने म्हटले.
बिग बॉस 19 चा आज फिनाले असून फिनालेच्या दिवशीही सलमान खान तान्या मित्तलचा क्लास लावताना दिसला. सर्वजण तुलाच टार्गेट करतात असे तुला वाटते म्हणताना सलमान खान दिला.
बिग बॉस 19 चे टॉप 5 फायनलिस्ट धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. गाैरव खन्ना याच्या डान्सने सुरूवात झाली.
बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात झाली असून सलमान खान याची धमाकेदार एंट्री झाली आहे.
बिग बॉस 19 च्या आपल्या आवडत्या कोपऱ्यात जाऊन प्रणित मोरे भावूक झाला. यादरम्यान त्याने मालती चहर हिचे देखील नाव घेतले.
बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात झाली असून घरातील आवडत्या कोपऱ्यात आठवणीसाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी पहिली संधी गाैरव खन्नाला दिली.
बिग बॉस 19 च्या फिनालेची वाट गेल्या अनेक दिवसांपासून चाहते बघत होते. शेवटी तो क्षण आला असून बिग बॉस 19 च्या फिनालेला काही सेकंदात सुरूवात होईल.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा बिग बॉस 19 ला होस्ट करत आहे. सलमान खान ग्रॅंड फिनालेमध्ये दबंग स्टाईल येणार आहे. माधुरी दीक्षित देखील बिग बॉसच्या मंचावर दिसेल.
Amaal and Shehbaz are performing at the finale on the song “Hello Brother”🤝
Bigg Boss 19’s most real n genuine bond🧿
Brotherhood on top🔥TROPHY BELONGS TO AMAAL#AmaalMallik #BiggBoss19 pic.twitter.com/tt6fSHocn8
— 𝑵𝒊𝒅𝒉𝒊🕊 (@nidhirajput09) December 7, 2025
बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले रात्री 9 वाजता सुरू होईल. त्याआधी, द खबरी ऑन एक्स ने दावा केला आहे की अमाल मलिक ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा खरोखरच मोठा धक्का म्हणावा लागेल.
EXCLUSIVE #BiggBoss19#AmaalMalik Eliminated on 5th position
— The Khabri (@TheKhabriTweets) December 7, 2025
ईशा मालवीयाने गौरव खन्ना यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण हंगामात प्रतिष्ठा, आदर आणि प्रामाणिकपणाने खेळणारा माणूस विजयास पात्र आहे, असे तिने म्हटले.
बिग बॉस 19 चा आज ग्रॅंड फिनाले आहे. 9 वाजता फिनालेला सुरूवात होईल. त्यापूर्वी वोटिंगबद्दल मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. प्रणित मोरे वोटिंगमध्ये मागे पडल्याचे सांगितले जात आहे.
नेहा चुडासमाने फरहाना भट्टच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून ती लोकांना फरहानाला वोटिंग करण्याचे आवाहन करताना दिसली.
माधुरी दीक्षित तिच्या मिसेस देशपांडे च्या प्रमोशनसाठी बिग बॉस 19 च्या फिनालेला उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे खास लूकमध्ये यावेळी माधुरी दीक्षित दिसेल.
बिग बॉस 19 च्या बक्षीस रकमेसह दरवर्षी निर्माते बिग बॉस विजेत्यांना ट्रॉफी देतात. या सीझनचा विजेता जो कोणी जिंकेल त्याला ट्रॉफी आणि 50 लाख रुपये मिळणार आहेत.
चाहत्यांनी केला गौरव खन्ना याच्या नावाचा जयजयकार. गौरव खन्ना BB19 मध्ये धाडसी मनाने गेला. प्रत्येक अडचणीने त्याला अधिक मजबूत बनवले, प्रत्येक क्षणाने त्याला चमकवले. बिग बॉसचा विजेता गाैरव खन्ना असे लोक एक्सवर पोस्ट करत आहेत.
ग्रँड फिनालेचा एपिसोड टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रसारित होणार आहे. सुरूवातीला ओटीटीवर 9 ला आणि टीव्हीवर 10.30 ला सुरूवात होणार असे सांगितले जात होते. मात्र, स्पष्ट झाले आहे की, एकाच वेळात सुरूवात फिनालेला सुरूवात होईल.
बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमध्ये भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग परफॉर्म करणार आहे. मात्र, फिनालेपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याला धमकी दिल्याचे वृत्त आहे. बिश्नोई टोळीने त्याला सलमानसोबत काम करू नये नाही तर वाईट परिणांमा सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली.
वोटिंग ट्रेंड आणि सोशल मीडिया ट्रेंड ट्रॅकर्सनुसार, गौरव खन्ना सध्या आघाडीवर आहे. अमाल मलिक दुसऱ्या स्थानावर आहे. फरहाना भट्ट तिसऱ्या स्थानावर आहे. तर प्रणित मोरे शेवटच्या स्थानावर असल्याची माहिती मिळतंय.
वोटिंगचा ट्रेंड आणि सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार, गाैरव खन्ना हा आघाडीवर आहे. अमाल मलिक दुसऱ्या स्थानावर आहे. फरहाना भट्ट तिसऱ्या स्थानावर आहे. तान्या मित्तल आणि प्रणित मोरे पिछाडीवर आहेत.
फरहाना भट्टने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये बिग बॉस 19 च्या मंचावर लक्ष वेधून घेतले. फरहाना भट्टचा लूक चाहत्यांना आवडताना दिसत आहे.
अमाल मलिक बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमध्ये ग्लॅमर भरण्यास सज्ज आहे. धमाकेदार लूक अमान मलिक याचा बघायला मिळतोय.
गाैरव खन्ना बिग बॉस 19 चा टॉप 5 फायनलिस्टपैकी एक आहे. गाैरव खन्ना हाच विजेता होईल, असे सांगितले जात आहे. गाैरव खन्ना याचा फिनालेदरम्यान धमाकेदार डान्स होणार असून त्याचे फोटो व्हायरल झाली आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यन हा देखील बिग बॉस 19 च्या मंचावर येणार आहे. “तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी” च्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार आहे. यावेळी तो धमाल करताना दिसले.
रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण आधीच सुरू झाले आहे. टॉप 5 फायनलिस्टमध्ये जोरदार टक्कर होताना दिसले. चाहते आपल्या आवडत्या स्टारला विजेता करण्यासाठी सोशल मीडियावर सपोर्ट करत आहेत.
अशनूर कौर अंतिम भागात परफॉर्म करताना दिसेल. अशनूर बिग बॉस 19 च्या सेटवर दिसली होती. फिनालेच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.
बिग बॉस 19 ( Bigg Boss 19) ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून हे सीजन चर्चेत आहे. सुरूवातीच्या दिवसांपासूनच घरात मोठी हंगामे होताना दिसली. शेवटी आता बिग बॉस 19 ला त्यांची टॉप 5 फायनलिस्ट मिळाली आहेत. ग्रॅंड फिनाले (Grand Finale) ला अवघ्या काही तासात सुरूवात होईल. आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता करण्यासाठी चाहत्यांकडून प्रयत्न केली जात आहेत. सलमान खान विजेत्याच्या नावाची घोषणा करेल. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह फिनालेबद्दल बघायला मिळत आहे. प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमान मलिक, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल हे टॉपमध्ये पोहोचले असून यांच्यापैकी एकजण बिग बॉसचा विजेता होईल. बॉलिवूडचे अनेक कलाकार फिनालेमध्ये पोहोचणार आहेत. टॉप 5 फायनलिस्टचे खास डान्स होतील. सलमान खान (Salman khan) रात्री बाराच्यादरम्यान बिग बॉस 19 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करेल.