AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghanshyam Darode : ‘रुपाली ताई भोंदू बाबाच्या जाळ्यात महिलांना…’, छोट्या पुढारीच्या एका Video मुळे सर्वत्र खळबळ

Ghanshyam Darode : भोंदू बाबा अशोक खरात याचा खरा चेहरा समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला आहे. चाकरणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर छोट्या पुढारीने एक व्हिडीओ पोस्ट करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

Ghanshyam Darode : 'रुपाली ताई भोंदू बाबाच्या जाळ्यात महिलांना...',  छोट्या पुढारीच्या एका Video मुळे सर्वत्र खळबळ
| Updated on: Mar 22, 2026 | 8:29 AM
Share

Ghanshyam Darode : ‘रुपाली चाकणकर महिलांना वाचवत होत्या की, महिलांना त्याच्या जाळ्यात ढकलत आहेत…?’ असा सवाल उपस्थित करत बिग बॉस मराठी 5′ फेम छोटा पुढारी म्हणजेच घनःश्याम दरोडे यानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या सुरु असलेल्या प्रकरणावर संताप व्यक्त करत छोटा पुढारी म्हणाला, मित्रांनो आपण म्हणतो देश एकवीसाव्या शतकाकडे जात आहे, अधुनिक काळाकडे जात आहे… प्रगती होत आहे, पण एकंदरीत प्रगती होत असताना, तितक्याच झपाट्याने महाराष्ट्र मागे येतोय का? हे पाहणं देखील फार गरजेचं आहे. कारण आज लोकांना भोंदू बाबाचं फार वेड लागलं आहे… त्याने काही कानात फुकलं, तर आपण आपला इतिहास विसरायचा… आपण कोणत्या पदावर आहोत…

‘मी तुम्हाला तिच गोष्ट सांगतो, हा कोण भोंदू बाबा, लबाड लांडगा नाशिकचा अशोक खरात… याचे कारनामे पाहिले तर लाज वाटते… पीडित महिलांवर त्याने बलात्कार केलेत…. अत्याचार केलेत… त्याचे पुरावे, सीसीटीव्ही फुटेज सर्व समोर आलेत आणि त्याला अटक केली आहे. त्याला सेलिब्रिटींनी तर साथ दिलीच, पण त्याने ज्या महिलांवर अत्याचार केलेत, त्यांच्या आवज उठवणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सुद्धा त्याला साथ देत होत, त्याच्या मंदिराच्या त्या अध्यक्षा होत्या…’

‘एवढंच नाही तर, भोंदू बाबाला गुरु मानलं आणि त्याच्या बायकोला गुरु माऊली… म्हणजे त्यांना विठ्ठल – रखुमाईचा दर्जा दिला. मला सांगायचं आहे, राजकारण्यापासून समाज आदर्श घेत असतो आणि तुम्ही समाजाला काय आदर्थ देताय, तुम्ही एवढ्या अंधश्रद्धाळू केव्हा झाल्यात? लोकांना तुम्ही सांगता अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी करा.’

‘रुपालीताई तुम्ही महिलांना वाचवण्याऐवजी महिलांना त्याच्या जाळ्यात ढकलताय का? मला तर वाटतं, चाकणकर बाईंची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे… कारण कसं आहे गुन्हा करण्यापेक्षा गुन्हेगाराला साथ देणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो… या भोंदू बाबांना अजिबात थारा दिला नाही पाहिजे. पोलिसांना, प्रशासनाला काही करता आलं नाही तर, एक विनंती आहे, यांना जनतेच्या ताब्यात द्या, नाही जोड्याने मारलं तर… आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही मेहनत करा… या अंगाऱ्या धुपाऱ्याने काहीही होणार नाही…’ असं देखील नःश्याम दरोडेनं व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?