Elvish Yadav | ‘बिग बॉस ओटीटी 2’ फेम एल्विश यादवची तुफान क्रेझ; लाखो चाहत्यांनी केला ट्रॅफिक जाम

बिग बॉसच्या घरात सध्या पाच स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये अभिषेक मल्हान, एल्विश यादव, बेबिका धुर्वे, मनीषा राणी आणि पूजा भट्ट यांचा समावेश आहे. यांच्यापैकी एक स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव कोरणार आहे.

Elvish Yadav | 'बिग बॉस ओटीटी 2' फेम एल्विश यादवची तुफान क्रेझ; लाखो चाहत्यांनी केला ट्रॅफिक जाम
Elvish YadavImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर्सचं पारडं जड असल्याचं पहायला मिळतंय. अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये चांगली टक्कर पहायला मिळतेय. सोशल मीडियावरही या दोघांना चाहत्यांकडून जोरदार पाठिंबा मिळतोय. या दोघांपैकीच कोणीतरी विजेता ठरणार, असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या दोघांची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे, याची झलक नुकतीच दिल्लीत पहायला मिळाली. एल्विशच्या चाहत्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर येऊन ट्रॅफिक जाम केला. दिल्लीत एल्विशसाठी कार रॅली काढण्याच्या निर्णय त्याच्या चाहत्यांनी घेतला. त्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि ट्रॅफिक जाम झाला.

जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक एल्विशला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. कार, बाईक या वाहनांसह चाहते या रॅलीत सहभागी झाले होते. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गर्दी थोड्या वेळात इतकी वाढली की अखेर त्याला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर यावं लागलं.

हे सुद्धा वाचा

गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर आयोजकांना एल्विशसाठी आयोजित केलेला कार्यक्रमच रद्द करावा लागला. बिग बॉस या शोमधील एखाद्या स्पर्धकासाठी अशा प्रकारची गर्दी जमण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी एमसी स्टॅन आणि शिव ठाकरेच्या चाहत्यांनी अशाच पद्धतीने रस्त्यावर तुफान गर्दी केली होती. अमरावतीमध्ये बिग बॉस सोळाचा स्पर्धक शिव ठाकरेच्या चाहत्यांनी रस्त्यावर रॅली काढली होती. त्यावेळी अशीच गर्दी झाली होती.

एल्विशचे इन्स्टाग्रामवर 11.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. युट्यूबचा विचार केला तर त्याचे 17 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत आणि फेसबुकवर 4.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. एल्विश हा व्लॉगिंगसोबत स्वत:चा क्लोथिंग ब्रँडसुद्धा चालवतो. त्याची संपत्ती दोन कोटी रुपयांच्या घरात आहे. एल्विशकडे आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे.

बिग बॉसच्या घरात सध्या पाच स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये अभिषेक मल्हान, एल्विश यादव, बेबिका धुर्वे, मनीषा राणी आणि पूजा भट्ट यांचा समावेश आहे. यांच्यापैकी एक स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव कोरणार आहे. सोशल मीडियावरील ट्रेंड पाहता अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोन स्पर्धकांमध्ये अंतिम चुरस रंगू शकते.

Non Stop LIVE Update
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील.
...तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध
...तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध.