AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली.. ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादवने वाजवली कानाखाली

युट्यूबर एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी 2'चं विजेतेपद पटकावल्यानंतर प्रचंड प्रसिद्धी मिळवली. मात्र अनेकदा काही वादातही तो सापडला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीच्या कानाखाली वाजवताना दिसतोय.

प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली.. 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता एल्विश यादवने वाजवली कानाखाली
Elvish YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2024 | 10:34 AM
Share

मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद पटकावणारा युट्यूबर एल्विश यादव तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सलमान खानच्या शोमध्ये येण्याच्या आधीपासूनच त्याची फॅन फॉलोइंग तगडी होती आणि शोचा विजेता ठरल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली. बिग बॉसमध्ये त्याची आक्रमक खेळी चर्चेत राहिली आणि चाहत्यांकडूनही त्याला पाठिंबा मिळाला. मात्र शोमधून बाहेर आल्यानंतर तो सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आला आहे. याआधीही त्याचं नाव विषारी सापांच्या तस्करीप्रकरणात समोर आलं होतं. आता एल्विशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रेस्टारंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या कानाखाली मारताना दिसत आहे.

एल्विश हा प्रसिद्ध युट्यूबर असून त्याला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलंय. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एल्विश एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसतोय. हा व्हिडीओ राजस्थानमधील जयपूर इथल्या एका रेस्टॉरंटमधला असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये एल्विश एका रेस्टॉरंटमध्ये जात असतो. तो पुढे चालत असताना अचानक मागे येतो आणि बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला जोरात कानाखाली मारतो. यानंतर तिने मोठा वाद निर्माण होतो. एल्विश पुन्हा एकदा त्या व्यक्तीला मारायला जातो, पण यावेळी त्याला आजूबाजूचे लोक थांबवतात. एल्विशचा राग शांत करायचा ते प्रयत्न करतात. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीसुद्धा तिथे येतो आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो.

पहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ पाहून नेटकरी असा अंदाज वर्तवत आहेत की एल्विशला कोणी काही बोललं असेल आणि त्यानंतर तो त्या व्यक्तीला मारायला मागे आला असेल. या व्हिडीओमध्ये एक आवाजसुद्धा ऐकायला मिळतोय, ज्यामध्ये एक व्यक्ती एल्विशला विचारतो की ज्या व्यक्तीला त्याने कानाखाली मारली, त्याने असं का म्हटलं? सोशल मीडियावर एल्विशचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओबद्दल अद्याप एल्विशकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.