AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर संकट, BMC कडून नोटीस जारी, काय आहे प्रकरण?

परवानगीशिवाय बांधकाम केल्याबद्दल बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईतील मालाडमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईचा इशारा बीएमसीने दिला आहे. यावर अद्याप मिथुन दा यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर संकट, BMC कडून नोटीस जारी, काय आहे प्रकरण?
फाईल फोटो
| Updated on: May 18, 2025 | 12:33 PM
Share

बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना BMC ने नोटीस जारी केली आहे. मुंबईतील मालाड परिसरातील एरंगल गावात एका भूखंडाच्या तळमजल्यावर परवानगीशिवाय बांधकाम केल्याचा आरोप मिथुन यांच्यावर आहे. याबद्दल बीएमसीने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यावर अद्याप मिथुन चक्रवर्ती यांनी अधिकृत वक्तव्य केलं आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नोटीस मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना आता बांधकाम का पाडू नये याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा नेमकं कारण सांगू शकले नाही तर बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल… असा बीएमसीने इशाराही दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकाने मड परिसरात 100 हून अधिक बेकायदेशीर बांधकामे शोधली आहे. यामध्ये काही असे देखील बंगले आहेत जे चुकीच्या नकाशांच्या आधारे बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारती पाडण्याचा तयारीत बीएमसी आहे. याचा अर्थ बीएमसी बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच्या तयारीत आहे.

मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 351(1अ) अंतर्गत बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस पाठवली आहे. सांगायचं झालं तर, 10 मे रोजी मिथुन चक्रवर्ती यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्तर देण्यासाठी अभिनेत्याला एक आठवड्याला अवधी देण्यात आला आहे. बांधकान का पाडलं जाऊ नये यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट करावं लागणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एरंगल गावातील हीरा देवी मंदिराजवळील तपासणीदरम्यान अनेक बेकायदेशीर बांधकामे आढळून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेथे दोनपेक्षा जास्त मेझानाइन मजले असलेल्या इमारती, एक तळमजला इमारत आणि विटा, लाकूड, काच आणि एसी शीटपासून बनवलेल्या तीन तात्पुरत्या झोपड्या आढळल्या. हे सर्व परवानगीशिवाय बनवलं आहे.

Follow Us
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.