AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : धर्मेंद्र यांनी फार्म हाऊसवर काढलेलं असं काम, पण त्याआधीच ते निघून गेले… बॉबी देओलकडून आता खुलासा

Dharmendra : बॉबी देओलने आता धर्मेंद्र यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. धर्मेंद्र यांचं मागच्यावर्षी 25 नोव्हेंबरला निधन झालं. पण त्याआधी त्यांनी फार्म हाऊसवर एक काम काढलेलं. आता बॉबी देओलने त्या बद्दल खुलासा केला आहे.

Dharmendra : धर्मेंद्र यांनी फार्म हाऊसवर काढलेलं असं काम, पण त्याआधीच ते निघून गेले... बॉबी देओलकडून आता खुलासा
Dharmendra-Bobby DeolImage Credit source: instagram
| Updated on: Jun 12, 2026 | 8:36 AM
Share

प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं मागच्यावर्षी 25 नोव्हेंबरला निधन झालं. निधन होण्याआधी धर्मेंद्र आपला जास्त वेळ लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर घालवायचे. धर्मेंद्र तिथे शेती करायचे. नैसर्गिक वातावरणात वेळ घालवणं त्यांना आवडायचं. धर्मेंद्र अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर फार्म हाऊसचे फोटो शेअर करायचे. धर्मेंद्र यांना दारुचा खूप शौक होता. अनेकदा ते दारु बद्दल बोलायचे. आता धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने, धर्मेंद्र यांना दारु किती प्रिय होती, त्या बद्दल त्याने सांगितलं. धर्मेंद्र त्यांच्या फार्म हाऊसवर एक बार बनवत होते. वडिलांच्या दारुच्या प्रेमाबद्दल बोलताना बॉबी देओलने दारु जगातील सर्वात वाईट ड्रग असल्याचही सांगितलं.

बॉबी देओलने अलीकडेच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये काही आठवणी सांगितल्या. वडिल धर्मेंद्र यांच्याबद्दल तो बोलला. वडिलांनी त्यांच्या आयुष्याला एक शिस्त लावली होती. पण एकच प्रॉब्लेम होता. ते दारु प्यायचे. बॉबी देओलने सांगितलं की, “त्यांना दारु खूप आवडायची. दारु बद्दल त्यांचं प्रेम एक वेगळ्या लेवलच होतं. त्यांचं दारुवर प्रेम होतं. ते फार्म हाऊसवर एक बार बनवत होते”

भरपूर बॉटल केलक्ट केल्या होत्या

धर्मेंद्र यांचं बारचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी जगाचा निरोप घेतला. बॉबा देओलने आता धर्मेंद्र यांच्या बारच्या अपूर्ण स्वप्नाबद्दल सांगितलं. त्यांनी भरपूर बॉटल केलक्ट केल्या होत्या. मला बार बनवायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं. पण ते हे स्वप्न पूर्ण करु शकले नाहीत. धर्मेंद्र अनेकदा त्यांच्या दारुच्या प्रेमाबद्दल भरभरुन बोलायचे. पण हा फार कमी लोकांना माहित आहे की, काही वर्ष आधीच त्यांनी दारुची सवय सोडलेली. त्यांनी लहरेला दिलेल्या मुलाखतीत दारु एक वाईट गोष्ट असल्याचं सांगितलं होतं.

किंमत जवळपास 100 ते 150 कोटी रुपये

मुंबईच्या बिझी लाइफपासून दूर धर्मेंद्र त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर रहायचे. त्यांचं हे फार्म हाऊस जवळपास 100 एकरमध्ये पसरलेलं आहे. त्याची किंमत जवळपास 100 ते 150 कोटी रुपये आहे. धर्मेंद्र यांनी ही प्रॉपर्टी 90 च्या दशकात विकत घेतली होती. फार्म हाऊसवर शेती शिवाय ते पशूपालनही करायचे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर