अभिषेक बच्चन याचा ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘तो’ खुलासा, म्हणाला, पूर्णपणे निराश आणि

अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन यांच्यासोबत विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी खास लूकमध्ये अभिषेक दिसला. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या सुरू असल्याचे बघायला मिळतंय.

अभिषेक बच्चन याचा ऐश्वर्या राय हिच्याबद्दल तो खुलासा, म्हणाला, पूर्णपणे निराश आणि
Abhishek Bachchan and aishwarya rai
| Updated on: Sep 06, 2024 | 2:03 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर सध्या ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. विशेष म्हणजे यांचे लग्न त्यावेळी सर्वाधिक चर्चेत असणारे होते. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जातंय.

सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा आहे. मात्र, यावर भाष्य कोणीही करताना दिसत नाहीये. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत जलसा बंगल्यावर पोहोचली होती. यावेळी ती चांगलीच रागात दिसत होती. ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती आपल्या मुलीसोबत आईच्या घरी राहत असल्याचे सांगितले जातंय.

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करताना दिसला. अभिषेक बच्चन म्हणाला की, माझी पत्नी, मी आणि माझे वडील कोरोनाच्या काळात एकदाच दवाखान्यात होतो. घरी जाणारा शेवटचा सदस्य त्यावेळी मी होतो. कोरोनामुळे जवळपास सर्वच बंद होते.

हातामध्ये काम नसल्याने आणि कमाई कशी होणार, यामुळे मी चिंतेत होता. पैसे कसे कमवायचे हेच मला कळत नव्हते. त्यावेळी मी थोडा निराश झालो होतो. यावेळी ऐश्वर्या राय हिने माझा सपोर्ट केला. तिने मला याची जाणीव करून दिली की, तुझ्याजवळ कुटुंब आहे आणि या वाईट काळात अनेक लोकांजवळ ते देखील नाहीये.

ऐश्वर्या राय ही कायमच माझ्यासोबत उभी राहत असल्याचे देखील अभिषेक बच्चन याने सांगितले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांचा वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यांचा वाद नेमका कशावरून सुरू आहे हे कळू शकले नाहीये. ऐश्वर्या राय ही सतत विदेशात जाताना दिसत आहे. यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत कधीच अभिषेक बच्चन हा दिसत नाही. मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात जाताना ऐश्वर्या राय ही दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us