ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच, अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल थेट मोठा खुलासा, अभिनेत्रीला…
Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सुरू आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक हे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, दोघांनीही यावर भाष्य केल नाहीये. बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही यावर भाष्य करताना दिसत नाहीये.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनंत अंबानीच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत विदेशात जाताना स्पॉट झाली. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे विभक्त होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, त्यावर अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहतेही हैराण झाले आहेत.
नुकताच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन जलसा बंगल्यात जाताना दिसली. यावेळी ऐश्वर्या राय ही चांगलीच रागात दिसत होती. अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्यानेच वाद सुरू झाल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला असून त्यांच्याकडे मोठी संपत्ती आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी थेट म्हटले होते की, मी आणि जयाने मिळून एक निर्णय घेतला की, आमच्या संपत्तीचे दोन हिस्से होणार आहेत. प्रत्येक गोष्ट दोन भागांमध्ये वाटली जाईल. संपूर्ण संपत्ती ही अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्यात विभागली जाईल.
लोक म्हणतात की, लग्न झाल्यानंतर मुलीचा काहीच अधिकार नसतो. मात्र, आमच्यासाठी आमचे दोन्ही लेकरं एकसमान आहेत आणि दोघांनाही सर्व संपत्ती मिळणार आहे. मुलगा आणि मुलीमध्ये आम्ही भेदभाव करत नसल्याचेही अमिताभ बच्चन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच अमिताभ बच्चन यांची संपत्ती अर्धी श्वेता बच्चनला आणि अर्धी अभिषेक बच्चनला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.
ऐश्वर्या राय हिला अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीमधून काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यावरच राहत असल्याचेही सांगितले जातंय. हीच गोष्ट ऐश्वर्या राय हिला आवडत नसल्याचे सांगितले जाते. श्वेता बच्चन हिचा लेक अगस्त्य नंदा याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. त्याचा पहिला चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. घटस्फोटाच्या चर्चांमध्येच आता अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा विषय पुढे आलाय.