AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय चित्रपटाच्या सेटवरच रडली ढसाढसा, म्हणाली, मला माझ्या परिस्थितीवर…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आलीये. ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय चित्रपटाच्या सेटवरच रडली ढसाढसा, म्हणाली, मला माझ्या परिस्थितीवर...
Aishwarya Rai
| Updated on: Sep 08, 2024 | 12:47 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अगोदर दोघे एकमेकांना डेट करत होते. शेवटी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचे खासगी आयुष्यात चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर कोणीही भाष्य केले नाहीये. घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसली. यावेळीचे तिचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. ऐश्वर्या राय हिच्यामुळे विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद बघायला मिळाले. नुसता वादच नाही तर दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. सार्वजनिकपणे दोघे आरोप करत होते. हे दोघेही गंभीर आरोप करत होते.

ज्यावेळी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात वाद सुरू होता, त्यावेळीच ऐश्वर्या राय ही चित्रपटाचे शूटिंग करत होती. दोघांमधील वादाचा परिणाम ऐश्वर्या राय हिच्यावर असा झाला की, ती थेट चित्रपटाच्या सेटवरच सर्वांसमोर रडत होती. गुजारिश चित्रपटाचे शूटिंग त्यावेळी ऐश्वर्या राय ही करत होती.

ऐश्वर्या राय हिने त्यावेळी म्हटले होते की, मला पाहिजे तसे मी माझे आयुष्य जगत आहे. मी प्रार्थना करते की, बाकी लोकांनीही तसेच करावे. मला खरोखरच माझ्या परिस्थितीवर सोडून द्यावे. यासोबतच ऐश्वर्या राय हिने म्हटले होते की, सलमान आणि विवेक दोघेही जे काही करत आहेत, ते चांगले नाहीये.

सलमान खान याच्यावर आरोप होता की, त्याने ऐश्वर्याला मारहाण केली होती. यावर अभिनेत्याने थेट म्हटले होते की, मी जर तिला मारले असते तर ती आज जिवंत राहिली नसती. विवेक यानेही आरोप केला होती की, त्याने अभिनेत्रीची पूर्णपणे साथ दिली. मात्र, तिने त्याला मध्येच सोडून गेली. हेच नाही तर सलमान खान विवेकच्या घरी त्याला मारण्यासाठी गेल्याचे देखील सांगितले जाते.

Follow Us
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप