अमिताभ बच्चन यांनी केली प्रभासची तक्रार, बिग बी यांना 37 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याचे..
अभिनेता बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांनी मोठी तक्रार केलीये.

अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपल्या घरातील मंदिराचे फोटो शेअर केले होते. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच काैन बनेंगा करोडपतीमध्ये धर्मेंद्र यांच्याबद्दलचा एक अत्यंत मोठा किस्सा सांगितला.
अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या आगामी ‘क्लिक 2898 AD’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बुधवारी मुंबईमध्ये चित्रपटाच्या प्री रिलीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास, कमल हसन, राणा दग्गुबाती उपस्थित होते.
यावेळी प्रभास आणि अमिताभ बच्चन यांचे नाते मजेदार दिसले. यावेळी दोघांनी एकमेकांच्या तक्रारी केल्या. यावेळी प्रभास याने सांगितले की, ज्यावेळी तो अमिताभ बच्चन यांच्या पाया पडत होता, त्यावेळी नेमके काय घडले. प्रभास अमिताभ बच्चन यांच्या पाया पडत असताना बिग बीने त्याला पाया पडण्यापासून रोखले.
प्रभास म्हणाला की, बिग बी मला त्यांच्या पाया पडू देत नाहीत. त्यावेळी प्रभासला थांबवत अमिताभ बच्चन म्हणतात की, चल दोघे एकमेकांच्या पाया पडू. अमिताभ बच्चन हे पुढे म्हणतात की, प्रभास याने देखील मला त्याच्या पाया पडू दिले नाही. यावेळी राणा दग्गुबाती हा प्रभासला सपोर्ट करताना देखील दिसला.
राणा दग्गुबाती म्हणाला की, प्रभास माझा मित्र आहे, चित्रपटात तो वेगळा दिसतो. मात्र, रिअल लाईफमध्ये तो खूप जास्त स्वीट नक्कीच आहे. राणा दग्गुबाती म्हणतो की, प्रभास पाया पडत होता, त्यामध्ये चुकीचे नेमके काय होते? अमिताभ बच्चन आणि प्रभास दोघे चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
