AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी केला ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, थेट म्हणाले, ती तिच्या मतावर…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे. सोशल मीडियावरही अमिताभ हे चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

अमिताभ बच्चन यांनी केला ऐश्वर्या राय हिच्याबद्दल 'तो' मोठा खुलासा, थेट म्हणाले, ती तिच्या मतावर...
Amitabh Bachchan and Aishwarya Rai
| Updated on: Oct 08, 2024 | 11:51 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. ऐश्वर्या राय हिला तिच्या अभिनयासाठी नुकताच पुरस्कार मिळालाय. मात्र, अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचेही सांगितले जातंय. अनंत अंबानी याच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही विदेशात गेली. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्या बच्चन हीच फक्त होती. मुलगी आराध्या कायमच ऐश्वर्याच्यासोबत दिसते. यावरून ऐश्वर्या हिला प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर सडेतोड उत्तर देताना ऐश्वर्या राय ही दिसली. ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

ऐश्वर्या रायचे काैतुक करताना कायमच अमिताभ बच्चन हे दिसतात. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्यात सून आणि सासऱ्याचे नाते नसून अमिताभ बच्चन हे ऐश्वर्याला मुलगी मानतात. जया बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये थेट म्हटले होते की, ऐश्वर्या ज्यावेळी घरात असते त्यावेळी अमिताभ बच्चन हे खूप जास्त आनंदी असतात.

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. आराध्या हिच्या जन्मानंतर सूनेबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, मला खरोखरच ऐश्वर्याचे खूप जास्त काैतुक नक्कीच आहे. तिने प्रसूती वेदना 2 ते 3 तास सहन केल्या. पण ती तिच्या मतावर ठाम होती की, तिला नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे. 

खूप जास्त त्रास होत असतानाही तिने एपिड्युरल किंवा पेन किलर औषध घेतले नाहीत. हे पहिल्यांदा नव्हते की, अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या राय हिचे काैतुक केले. कायमच अमिताभ बच्चन हे ऐश्वर्या राय हिचे काैतुक करताना दिसतात. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना त्यावर अजिबातच भाष्य करताना अमिताभ बच्चन हे दिसले नाहीत. 

हेच नाही तर ऐश्वर्या राय हिला IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पुरस्कार मिळाला. यावेळी तिच्यासोबत बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही पोहोचले नव्हते. फक्त मुलगी आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्या राय ही दिसली. हेच नाही तर पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्याचे काैतुक करणारी एकही पोस्ट बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही सोशल मीडियावर शेअर केली नाही.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ