AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, अमिताभ बच्चन थेट म्हणाले, मी स्वत:ला लाचार समजून…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत.

एकीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, अमिताभ बच्चन थेट म्हणाले, मी स्वत:ला लाचार समजून...
Amitabh Bachchan
| Updated on: Aug 06, 2024 | 11:22 AM
Share

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला असून त्यांच्या चित्रपटांनी धमाका केलाय. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा गूडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बच्चन कुटुंबात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेत असल्याची जोरदार चर्चा आहे.

यावर अमिताभ बच्चन यांनी काहीच भाष्य केले नाहीये. अमिताभ बच्चन हे लवकरच काैन बनेंगा करोडपतीचे 16 वे सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या काैन बनेंगा करोडपतीच्या 16 व्या सीजनचे शूटिंग सुरू आहे. नुकताच याचेच काही फोटो आणि खास पोस्ट अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये शेअर केलीये. आता ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांची ही भावनिक पोस्ट आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, गेममध्ये काही मोठे आणि चांगले बदल झाले आहेत. यामधून आपण काय नेमके शिकतो यावर परिणाम होईल. ज्यावेळी समोरचा व्यक्ती सांगतो की, तो कोणत्या परिस्थितीमधून आलाय. त्याने किती जास्त सहन केले आहे आणि त्यानंतर तो त्या खुर्चीवर बसलाय. पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, हे खरोखरच खूप जास्त भावनिक असते.

या महिला आणि पुरूषांचे आयुष्य पाहून खूप जास्त लाचार झाल्यासारखे वाटते. पंरतू त्यांचे हे हास्य पिघळून टाकते. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेक आणि त्यांच्या आयुष्यातील परिस्थिती आमच्यासमोर येत आहे, ती वेळ खरोखरच खूप जास्त भावनिक नक्कीच असते. पुढे अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, त्यांच्या मदतीसाठी आम्ही साथ पुढे करतो, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी मदत करतो.

अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट पाहून चाहतेही भावनिक झाल्याचे बघायला मिळतंय. 12 ऑगस्टपासून काैन बनेंगा करोडपतीचे 16 वे सीजन सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये काही मोठे बदल करण्यात आल्याचेही सांगितले जातंय. चाहते हे या नव्या सीजनची आतुरतेने वाट पाहताना देखील दिसत आहेत. काैन बनेंगा करोडपती या शोने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे.

Follow Us
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण