AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Kha | ‘भीक मागून चित्रपट हिट..’; शाहरुखच्या ‘जवान’बद्दल अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. येत्या 2 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Shah Rukh Kha | 'भीक मागून चित्रपट हिट..'; शाहरुखच्या 'जवान'बद्दल अभिनेत्याचं ट्विट चर्चेत
Image Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2023 | 3:32 PM
Share

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. बॉलिवूडमधील एखाद्या मोठ्या कलाकाराच्या चित्रपटाचं प्रमोशन असेल, तर ते धूमधडाक्यात आणि कोट्यवधी रुपये खर्चून झालंच पाहिजे, असं मानलं जातं. अत्यंत हटके प्रमोशन करून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचं काम आजवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चित्रपटांनी केलं आहे. मात्र पठाणच्या बाबतीत शाहरुखने असं काहीच केलं नव्हतं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने फक्त दोन-तीन वेळा ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. यावरून आता एका बॉलिवूड अभिनेत्याने टिप्पणी केली आहे. ‘भीक मागून चित्रपट हिट होत नाही, हे सिद्ध होतंय’, असं त्या अभिनेत्याने ट्विट केलंय.

‘पठाण या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी शाहरुख खान कोणत्याच न्यूज चॅनेलकडे, शोमध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमात गेला नव्हता. पण तरीही हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हीच गोष्ट तो ‘जवान’ चित्रपटासोबत करणार आहे. त्या चित्रपटाचं प्रमोशन तो फक्त सोशल मीडियावरच करेल आणि तोसुद्धा हिट होणार याची मला खात्री आहे. भीक मागून चित्रपट हिट होत नाही हे तो सिद्ध करतोय’, असं ट्विट कमाल आर. खानने केलंय.

केआरकेनं यापुढच्या एका ट्विटमध्ये शाहरुखचं कौतुक केलंय. ‘शाहरुखने सर्व पर्यायांवर चर्चा करण्यासाठी त्याची टीम आणि डिस्ट्रीब्यूटर्ससोबत अनेक बैठका केल्या. अखेर त्याने 2 जून 2023 रोजी जवानला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं असं मत आहे की चित्रपटाला हिट करण्यासाठी 20 दिवसांचं प्रमोशन पुरेसं आहे आणि शाहरुख खान अगदी योग्य आहे. कारण तो पठाणप्रमाणेच फक्त ट्विटरवर प्रमोशन करणार आहे’, असं केआरकेनं लिहिलं.

शाहरुखने पठाणचं प्रमोशन का नाही केलं?

‘कोणत्याही प्रमोशनशिवाय, प्रदर्शनापूर्वी माध्यमांना मुलाखती दिल्याशिवायही पठाणची डरकाळी बॉक्स ऑफिसवर जोरात ऐकायला मिळत आहे’, असं एका युजरने ट्विट केलं होतं. त्यावर शाहरुखने लिहिलं होतं, ‘मी विचार केला की सिंह इंटरव्ह्यू करत नाहीत, म्हणून यावेळी मीसुद्धा करणार नाही. फक्त जंगलात येऊन पहा.’

दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. येत्या 2 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. जवानमधील एका गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा झळकणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.