Dharmendra: ‘कमबख्त जान क्यों जाती है…’, धर्मेंद्र यांची ‘ती’ पोस्ट सर्वत्र चर्चेत

Dharmendra: धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे... ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांना शायरी ऐकवली आहे...

Dharmendra: कमबख्त जान क्यों जाती है..., धर्मेंद्र यांची ती पोस्ट सर्वत्र चर्चेत
Dharmendra
| Updated on: Nov 10, 2025 | 4:20 PM

Dharmendra: अगर तकदीर में मौत लिखी है तो कोई बचा नहीं सकता…, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना…, कुत्ते कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा…, दुनिया बहुत बुरी है शांति। जो कुछ देती है बुरा बनने के बाद देती है… दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे असे एकापेक्षा एक डायलॉग आजही चर्चेत आहेत… एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर धर्मेंद्र यांनी राज्य केलं.. पण आता धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आता देखील सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे…

व्हायरल होत असलेला व्हिडीओ स्वतः धर्मेंद्र यांनी पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी चाहत्यांना एक शायरी बोलून दाखवली… धर्मेंद्र म्हणालेले, ‘सबकुछ पाकर भी हासिल ए जिंदगी कुछ भी नहीं, कमबख्त जान क्यों जाती है जाते हुए’।’

 

 

पुढे धर्मेंद्र म्हणाले, ‘पता नहीं कहां ले जाएंगे, कौन ले जाएगा, साथ ले जाएंगे। खैर, यह इंसानी फितरत है कि इकट्ठा करते रहो। अपना ख्याल रखो…’, धर्मेंद्र यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.. व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट देखील केल्या..

धर्मेंद्र यांच्या पोस्टवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अभिनेता बॉबी देओल याने देखील कमेंट केली. वडिलांच्या पोस्टवर अभिनेत्याने दोन हार्ट इमोजी पोस्ट केले… शिवाय पोस्टच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी देखील आवाहन केलं.

पोस्टवर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मला तुमची शायरी प्रचंड आवडली…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुमच्या प्रेमासाठी शब्द नाहीत… लव्ह यू….’ धर्मंद्र कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र ‘इक्किस’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत आहेत. हा सिनेमा श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असल्याचं म्हटलं जातं.