Mushtaq Khan: मुश्ताक खान मागे सोडून गेले इतकी संपत्ती, नेटवर्थ जाणून व्हाल थक्क
Mushtaq Khan: 'सडक', 'दिल है कि मानता नहीं', 'साथी', 'आशिकी', 'गदर', 'वेलकम' यांसारख्या सिनेमात दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मुश्ताक खान यांच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. जवळपास 3 दशक बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर मोठी संपत्ती कमावली आहे.

Mushtaq Khan: बॉलिवूडचे लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘सडक’ या सिनेमापासून ‘दिल है कि मानता नहीं’, ‘साथी’, ‘आशिकी’, ‘गदर’, ‘वेलकम’ यांसारख्या सिनेमात दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या मुश्ताक खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुश्ताक खान यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. तर मुलांसाठी त्यांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ गाजवला… तर जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबद्दल…
किती आहे मुश्ताक खान यांची नेटवर्थ…
बॉलिवूड, टीव्ही आणि रिजनल सिनेमात जवळपास 3 दशक पेक्षा अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं. या प्रवासात त्यांनी गडगंज संपत्ती देखील कमावली. त्यांची संपत्ती 10 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 80 – 83 कोटी रुपये आहे. पण संपत्तीचा हा आकडा अधिकृत आहे की नाही याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
15 दिवसांपासून रुग्णालयात सुरु होते उपचार…
समोर येत असलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी नानावटी रुग्णालयात मुश्ताक खान यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी मुश्ताक खान यांचं निधन झालं आहे. कॅन्सरमुळे मुश्ताक खान यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पाच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, जो अचानक पुन्हा बळावला. अखेर 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मुश्ताक खान यांची मुले काय करतात?
मुश्ताक खान यांच्या पत्नीचं नाव सलमा खान असून, त्यांना दोन मुले आहेत. एका मुलाचं नाव मोहम्मद अरशद खान आहे, तर दुसरी मुलगी आहे. मुश्ताक खान यांना सूनही असून तिचे नाव सबा खान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती पेशाने एक शिक्षिका आहे. मुश्ताक खान यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
