AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूतची इच्छा अपूरी…., ‘या’ठिकाणी एकटा जाणार होता पण…

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यात... कोणती होणी अभिनेत्याची महत्त्वाची इच्छा..., 'या'ठिकाणी एकटा जाणार होता अभिनेता, अनेक वर्षांनंतर सत्य समोर, चर्चांना उधाण...

सुशांत सिंह राजपूतची इच्छा अपूरी....,  'या'ठिकाणी एकटा जाणार होता पण...
| Updated on: Nov 15, 2024 | 10:59 AM
Share

Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहे. पण आजही चाहते अभिनेत्याला विसरु शकले नाहीत. 14 जून 2020 मध्ये राहत्या घरी सुशांत याने स्वतःला संपवल्याची माहिती समोर आली. पण अद्यापही अभिनेत्याच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकलेलं नाही. गेल्या 4 वर्षांपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान, सुशांतसोबत असलेल्या आठवणी सेलिब्रिटी कायम सांगत असतात. नुकताच अभिनेता प्रतीक बब्बर याने सुशांतच्या इच्छांबद्दल सांगितलं आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ सिनेमात दोघे एकत्र दिसले होते.

प्रतीक बब्बरने सांगितले की, ‘छिछोरे’च्या शूटिंगनंतर सुशांतने एकटाच अंटार्क्टिकाला जाण्याची इच्छ व्यक्त केली होती. प्रतीक आणि सुशांत फार चांगले मित्र नव्हते. पण सिनेमातील बास्केटबॉल सीन शूट करण्यासाठी एकत्र आले होते. जेव्हा दोघांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.

प्रतीक म्हणाला, ‘सुशांत थोडा वेगळा होती. त्याने मला सांगितलं होतं, मी अंटार्क्टिका जाणार आहे…’ सांगायचं झालं तर 2019 मध्ये सुशांतने त्याच्या 50 स्वप्नांची यादी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पण सुशांत स्वतःचे 50 स्वप्न पूर्ण करू शकला नाही. सुशांत 50 पैकी फक्त 13 स्वप्न पूर्ण करू शकला.

सुशांत स्टारर ‘छिछोरे’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आजही सिनेमातील गाणी आणि काही सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुशांतच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. पण अभिनेत्याच्या मृत्यूचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. चाहते आणि कुटुंबिय अभिनेत्याला कधी न्याय मिळेल… याच प्रतीक्षेत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा