AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंभीर आजाराने त्रस्त अभिनेता, अंत्यसंस्कारानंतर मिळाली निधनाची बातमी, अभिनेत्याची शेवटची इच्छा म्हणजे…

Bollywood: आजची रात्र देखील मी जगेल की नाही माहिती नाही म्हणून..., बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची शेवटची इच्छा, चाहत्यांना अंत्यसंस्कारानंतर मिळाली अभिनेत्याच्या निधनाची बातमी, आजही अभिनेते असतात चर्चेत

गंभीर आजाराने त्रस्त अभिनेता, अंत्यसंस्कारानंतर मिळाली निधनाची बातमी, अभिनेत्याची शेवटची इच्छा म्हणजे...
| Updated on: Oct 09, 2024 | 12:07 PM
Share

बॉलिवूडचे असे अनेक रहस्य आहेत जे समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का असतो. बॉलिवूडमध्ये असा एका अभिनेता होऊन गेला. ज्याच्या अंत्यसंस्कारानंतर अभिनेत्याच्या निधनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली. अभिनेत्याचं शेवटचं दर्शन देखील चाहत्यांना करता आलं नाही. गंभीर आजाराने अभिनेत्याचं निधन झालं. अभिनेत्याला स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यामुळे अभिनेत्याने शेवटची इच्छा देखील व्यक्त केली.

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा सुरु आहे, ते अभिनेते दुसरे तिसरी कोणी नाही तर, राजकुमार आहेत. राजकुमार यांनी 3 जुलै 1996 मध्ये अखेरचा श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांच्या आजाराबद्दल देखील फार कमी लोकांना माहिती होतं. त्यांनी स्वतःचा आजार देखील सर्वांपासून लपवला होता. फक्त त्यांच्या मुलाला त्यांच्या आजाराबद्दल माहिती आहे.

राजकुमार यांनी मुलाला स्पष्टपणे समजावून सांगितलं होतं की, चित्रपटसृष्टीतील कोणालाही कर्करोगाची माहिती नसावी. पण असं म्हणतात ना सत्य कधीच लपत नाही… असंच काही राजकुमार यांच्याबद्दल झालं होतं. त्यांच्या आजाराबद्दल सर्वांना माहिती झालं. पण एक मुलाखतीत त्यांनी रंगाणाऱ्या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं. मी पूर्णपणे ठिक आहे… असं देखील एका मुलाखतीत म्हणाले होते. राजकुमार यांनी स्वतःच्या निधनाबद्दल देखील कोणाला कळू शकलं नाही.

राजकुमार यांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर स्वतःची शेवटची इच्छा व्यक्त केली. राजकुमार म्हणाले होते. ‘आजची रात्र देखील मी जगेल की नाही माहिती नाही… मला असं वाटतंय माझ्या सर्व नातेवाईकांना बोलावलं पाहिजे. मृत्यूनंतरच्या विधी पार पडल्यानंतर आणि तुम्ही सगळे घरी आल्यानंतर अन्य लोकांना माझ्या निधनाबद्दल सांगा. मला कोणताही तमाशा नको आहे…’ अशी राजकुमार यांची शेवटची इच्छा होती.

राजकुमार यांच्या अंत्यसंस्कारानंतर लोकांना मिळाली निधनाची माहिती

राजकुमारच्या कुटुंबीयांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि तसंच केलं. अभिनेत्याचा मृत्यू झाला तेव्हा कोणालाच त्याची माहिती मिळाली नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच लोकांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. राजकुमार आज जिंवत नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी आजही जिवंत आहेत.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत