Video : शाहरुख खान याने दिले चाहत्यांना मोठे गिफ्ट, व्हिडीओ तूफान व्हायरल, मुंबईमध्ये अभिनेता
शाहरुख खान याने एक मोठा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. शाहरुख खान याचा डंकी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मुंबई : शाहरुख खान याचा जवान (Jawan) हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने तगडी कमाई करण्यास ओपनिंग डेपासूनच सुरूवात केलीये. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे चित्रपट सध्या धमाका करताना दिसतायत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला आणि या चित्रपटाने धमाका केला. पठाण हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. विशेष म्हणजे शाहरुख खान हा पठाण चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जोरदार प्रमोशन करताना दिसला.
जवान चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरही शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहिला. शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन करताना दिसला. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला रिलीज होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. जवान चित्रपटाने 10 दिवसांमध्ये 440.48 कोटींची कमाई केलीये.
जवान चित्रपटाला मिळणारा चाहत्यांचा प्रतिसाद पाहून शाहरुख खान हा खूप जास्त आनंदी दिसतोय. शाहरुख खान नुकताच त्याच्या मन्नत बंगल्याच्या गॅलरीमध्ये आला. यावेळी तो चाहत्यांचे धन्यवाद मानताना दिसतोय. इतकेच नाही तर त्याची खास पोज देताना देखील यावेळी शाहरुख खान हा दिसतोय. शाहरुख खान खूप जास्त हॅप्पी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान याचा हा व्हिडीओ आता तूफान व्हायरल होताना दिसतोय. व्हिडीओमध्ये शाहरुख खान याला पाहून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. शाहरुख खान याला पाहून चाहते हे मोठ्या प्रमाणात गोंधळ करताना दिसत आहेत. यावेळी शाहरुख खान याने निळ्या रंगाचे टिशर्ट घातल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शाहरुख खान याचे फोटो आणि व्हिडीओ घेताना चाहते हे दिसत आहेत.
शाहरुख खान याने तब्बल चार वर्षानंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केलंय. शाहरुख खान याचा आता जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. तो चित्रपट फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते.
