AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan | शाहरुखच्या ‘जवान’बद्दल महेश बाबूच्या रिव्ह्यूची जोरदार चर्चा; म्हणाला ‘किंग खानने…’

साऊथ सुपरस्टार महेश बाबूने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटासाठी खास ट्विट केलं आहे. महेश बाबूने हा चित्रपट नुकताच पाहिला असून त्याला तो कसा वाटला, याबद्दल त्याने ट्विट केलं आहे. महेश बाबूच्या या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Jawan | शाहरुखच्या 'जवान'बद्दल महेश बाबूच्या रिव्ह्यूची जोरदार चर्चा; म्हणाला 'किंग खानने...'
Shah Rukh Khan and Mahesh BabuImage Credit source: Twitter
| Updated on: Sep 08, 2023 | 3:11 PM
Share

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीने आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ‘जवान’ने तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित किंग खानचं कौतुक केलं आहे. यामध्ये आता एका साऊथ सुपरस्टारचाही समावेश झाल आहे. अभिनेता महेश बाबूने ट्विट करत शाहरुख खान आणि दिग्दर्शक अटलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘जवान’ हा चित्रपट स्वत:चेच विक्रम मोडणार असल्याचा दावा त्याने केला आहे.

महेश बाबूकडून कौतुक

महेश बाबूने नुकताच ‘जवान’ हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. ‘जवान.. ब्लॉकबस्टर चित्रपट. अटलीने किंग साइज एंटरटेन्मेंट सिनेमा खुद्द किंगसोबत दिला आहे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट घेऊन आला आहे. शाहरुखचं व्यक्तीमत्त्व, करिश्मा आणि स्क्रीनवरील वावर हा अतुलनीय आहे. या चित्रपटात तो अक्षरश: पेटून उठला आहे. जवान स्वत:चेच विक्रम मोडणार असं दिसतंय. ही किती छान गोष्ट आहे. या लेजंड्सच्याच (महान व्यक्तीमत्त्व असलेले) गोष्टी आहेत’, अशा शब्दांत महेशने कौतुक केलं आहे.

शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला समिक्षकांनी चार ते पाच स्टार्स रेटिंग दिले आहेत. किंग खानसोबतच या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लहर खान, संजीता चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत. शाहरुखने या चित्रपटाद्वारे एक नवा विक्रम रचला आहे. गोपाळकालाच्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली. ‘जवान’च्या कमाईसमोर ‘पठाण’ आणि ‘गदर 2’ फिके पडले आहेत.

‘जवान’ची पहिल्या दिवसाची कमाई

मिळालेल्या माहितीनुसार ‘जवान’ने गुरूवारी 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशभरात तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सर्व भाषांमध्ये मिळून इतकी कमाई झाली आहे. फक्त हिंदी भाषेबद्दल बोलायचं झाल्यास शाहरुखच्या ‘जवान’ने 63 ते 65 कोटी रुपये कमावले आहेत. तर तमिळ आणि तेलुगू भाषेत पाच-पाच कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच दक्षिण भारतातही शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत आहे. शाहरुखने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘जवान’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.