जावई जहीर इक्बाल याला शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतरही कुटुंबात..
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला असून कायमच तिचे चित्रपट धमाका करतात. सोनाक्षीने जहीर इक्बालला सात वर्ष डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सात वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मात्र, सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालसोबतचे नाते अनेक वर्ष जगापासून लपवून ठेवले. सर्वात अगोदर तिने आई पूनम सिन्हा हिला सांगितले. सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे कळाल्यानंतर लोकांमध्ये संताप बघायला मिळाला. हेच नाहीर तर सोनाक्षीला जहीर इक्बालसोबत लग्न करण्यासाठी वडिलांना पटवण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागले. सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ तिच्या लग्नात उपस्थित नव्हते. सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या भावांनी पाठ फिरवली होती. मोठ्या विरोधानंतर सोनाक्षी हिने जहीर इक्बालसोबत लग्न केले. लग्नानंतर आपला कमेंट बॉक्सही सोनाक्षी सिन्हा हिने बंद केला. तिला वाईट गोष्टींपासून दूर राहायचे असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.
लग्न झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याचा दावा सतत केला जात होता. सोनाक्षीने स्पष्ट शब्दात सांगितले की, लोकांच्या हिशोबाने तर मी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून प्रेग्नंट आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी मुंबईत अत्यंत आलिशान घर घेतले असून काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या घराची झलक फराह खान हिच्या ब्लॉगमध्ये दाखवली. आता नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे मोठा वाद निर्माण झाला.
शत्रुघ्न सिन्हा यांनी नवीन वर्षानिमित्त खास दोन फॅमिली फोटो शेअर केले. या फोटोंपैकी एक फोटो कुश सिन्हाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील आहे. एक्सवर शत्रुघ्न सिन्हा यांनी हे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, 2026 हे वर्ष प्रेम, आनंद, शांती, समृद्धी आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेले असो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा…
May 2026 be filled with love, laughter, peace, prosperity and unforgettable moments. Happy New Year! pic.twitter.com/F747rCXC1c
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) January 1, 2026
या दोन्ही फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब दिसत आहे. मात्र, कुठेही दोन्ही फोटोमध्ये जावई जहीर इक्बाल हा दिसत नाही. यामुळे विविध चर्चांना उधाण आले. मुद्द्याहून शत्रुघ्न सिन्हा यांनी जहीर इक्बाल याचा फोटो टाकणे टाळल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर काही लोकांनी दावा करत म्हटले की, शत्रुघ्न सिन्हा जहीर इक्बाल याचा जावई मानतच नाहीत, जर ते जावई मानत असते तर नक्कीच फोटो टाकला असता.
