
मुंबई : विकी काैशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये विकी काैशल याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसली. जरा हटके जरा बचके या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार असे प्रेम दिले. विकी काैशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान यांची जोडी हिट ठरली. विकी काैशल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले.
विकी काैशल आणि सारा अली खान यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट सुपरहिट ठरला. विकी काैशल हा सध्या त्याच्या द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटामध्ये बिझी आहे. नुकताच विकी काैशल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना विकी काैशल हा दिसलाय. चक्क आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल यावेळी बोलताना विकी काैशल हा दिसलाय.
विकी काैशल याने कतरिना कैफबद्दल मोठे विधान केले. विकी काैशल म्हणाला की, मी आणि कतरिना कैफ खूप जास्त आळशी आहोत. ज्यावेळी आम्ही दोघे एकत्र घरी असतो आणि आमच्याकडे काही काम नसते आणि आम्हाला बाहेर जायचे नसते. त्यावेळी आम्ही दिवसभर चील मारतो. आम्ही दिवसभर फुल आराम करतो आणि आळशी होत बेडवर पडून राहतो.
यावेळी विकी काैशल थेट म्हणाला की, कतरिना कैफ ही कधी कधी राक्षससारखे वागते. ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. ती खूप जास्त काही गोष्टींची पालन करते. तिला अजिबात काही गोष्टी आवडत नाहीत. मग ती राक्षस होते. विकी काैशल याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
विकी काैशल याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला जरा हटके जरा बचके चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना कैफ ही दिसली होती. कतरिना कैफ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचे काैतुक केले. इतकेच नाही तर हा धमाकेदार चित्रपट पाहण्याची विनंती आपल्या चाहत्यांना करताना कतरिना कैफ ही दिसली.