व्लादिमीर पुतिन यांनी केले भारताला मालामाल, तब्बल 300 वस्तूंची यादी तयार, डोनाल्ड ट्रम्पला झटका, भारताने थेट..
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावत धक्का दिला. यावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला. रशिया थेट भारतासाठी मैदानातही उतरला.

भारत आणि रशियातील संबंध अनेक वर्षांचे आहेत. अमेरिकेकडून भारतावर प्रचंड दबाव रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी होता. यादरम्यानच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन थेट भारत दाैऱ्यावर आले आणि काही महत्वाचे करार त्यांनी केले. भारत आणि रशियाने ऊर्जा संबंधितही करार केली. अमेरिका आणि भारतात देखील व्यापार चर्चा सुरू आहे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचे कृषी मार्केट हवे आहे. मात्र, भारताकडून अगोदरच स्पष्ट केले की, आम्हाला आमचे शेतकरी सर्वात महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हे आमचे प्रामुख्य आहे. मात्र, अजूनही फक्त चर्चाच सुरू आहे. अमेरिकेकडून करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले गेले. त्यामागून पुतिन रशियाचे सात मंत्री घेऊन भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी अनेक महत्वाचे करार देखील भारतासोबत केली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे की, भारताने अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी आणि रसायनशास्त्र क्षेत्रांमधील तब्बल 300 उत्पादने भारतीय निर्यातदारांना रशियन बाजारपेठेत पाठवायचे आहेत. ही एक महत्वाची आणि मोठी संधी नक्कीच आहे. भारत आणि रशियाकडून 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत.
अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये रशियाची आयातीची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताचा पुरवठा वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उच्च-क्षमतेच्या उत्पादनांची निवड केली आहे. पुतिन यांनी केलेल्या करारांनंतर भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियातील निर्यात वाढवायची आहेत. अमेरिकेने ज्यावेळी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, त्यावेळीच रशियाने स्पष्ट केले की, आम्ही आमच्या बाजारपेठेत भारताच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात स्वागत करू.
रशियाने म्हटले ते केले आणि भारतासोबत महत्वाची करार केली. यामुळे भारत आणि रशियातील संबंध अधिकच चांगली झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, रशियाच्या एकूण आयात बास्केटमध्ये भारताचा वाटा अंदाजे 2.3 टक्के आहे. यादरम्यानच रशियाकडून होणारी आयात सातत्याने वाढत आहे. ही चांगली बातमी भारतासाठी नक्कीच आहे. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यानंतर भारतातील निर्यातदार चांगलेच कामाला लागले आहेत.
