AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकच तारीख, एकच वय आणि मृत्यूचं कारणही एक… बॉलिवूडच्या 2 जिगरी मित्रांच्या निधनानंतर रडलेला संपूर्ण देश

आपल्या भोवती घडणाऱ्या काही घटना असतात, ज्या प्रचंड धक्कादायक असतात. बॉलिवूडचे दोन जिगरी मित्र ज्यांचं निधन एकच तारखेला झालं आणि त्यांच्या मृत्यूचं कारणही एकच होतं.... त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश रडला होता.

एकच तारीख, एकच वय आणि मृत्यूचं कारणही एक... बॉलिवूडच्या 2 जिगरी मित्रांच्या निधनानंतर रडलेला संपूर्ण देश
| Updated on: Apr 28, 2026 | 10:40 AM
Share

काही योगायोग असे असतात, जे जुन्या आठवणी ताज्या करतात. पण काही आठवणी अशा देखील असतात, ज्या हैराण आणि दुःखी करतात. असंच काही बॉलिवूडच्या दोन जिगरी मित्रांसोबत झालं. ते दोन मित्र दुसरे तिसरे कोणी नाही तर, दिवंगत अभिनेते फिरोज खान आणि विनोद खन्ना आहेत. दोघांचं निधन एकाच तारखेला, एकाच वयात आणि एकाच कारणामुळे झालं. फिरोज खान आणि विनोद खन्ना यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण दोघांच्या निधनानंतर संपूर्ण जग रडलेलं.

आपल्या पिढीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विनोद खन्ना यांचं निधन, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सर्वात जवळचे मित्र फिरोज खान यांच्या निधनाच्या आठ वर्षांनंतर त्याच दिवशी झालं. मृत्यूच्या वेळी दोघांचंही वय सारखंच होतं आणि ते दोघेही कर्करोग या एकाच आजाराने ग्रस्त होते. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांचं 27 एप्रिल रोजी वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं.

वाईट काळात फिरोज खान यांनी दिली साथ

विनोद खन्ना यांच्यानंतर अमिताब बच्चन दुसरे लोकप्रिय अभिनेते होते. अशात विनोद खन्ना यांनी बॉलिवूडला निरोप दिला. एका मुलाखतीत विनोद खन्ना म्हटले होते, जगाला त्याच्यानुसार चालू देणं योग्य आहे… पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अनेक वर्ष विनोद खन्ना ओशोंच्या आश्रमात राहिले. ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अशात पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी फिरोज खान यांनी विनोद खन्ना मोठी मदत केली. ‘दयावान’ सिनेमातून विनोद खन्ना यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

फिरोज यांच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू होईपर्यंत दोघे आयुष्यभर मित्र राहिले. फिरोज यांच्या निधनाच्या काही दिवस आधी, विनोद यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत मुंबईतील रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, तेव्हा रुग्णालयात दोघेही खूप रडले. योगायोगाने, आठ वर्षांनंतर, जेव्हा विनोद यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झालं, तेव्हा त्याच दिवशी विनोद खन्ना यांचं देखील निधन झालं. 27 एप्रिल रोजी, विनोद यांनी अखेरचा श्वास घेतला.

Follow Us
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.