अमिषा पटेल होणार पकिस्तानची सून? वयाच्या 49 व्या वर्षी लग्नाबद्दल अभिनेत्रीने सोडलं मौन
Ameesha Patel on her Marriage: 'मी पण सिंगल, तो देखील सिंगल...', पकिस्तानी अभिनेत्यासोबत अमिषा पटेलचे 'प्रेमसंबंध', पाकिस्तानची सून होणार अभिनेत्री? काय आहे प्रकरण..., गेल्या काही दिवसांपासून अमिषा पटेल आहे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत...

Ameesha Patel on her Marriage: अभिनेत्री अमिषा पटेल हिने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. अमिषाच्या करियरची सुरुवात उत्तम झाली. ‘कहो ना प्यार’ सिनेमानंतर अभिनेत्रीचा ‘गदर : एक प्रेम कथा’ सिनेमा हीट ठरला. बॉलिवूडमधील सुरुवातीचे दिवस अमिषासाठी चांगले होते. पण नंतर अभिनेत्रीचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरू लागले. पहिल्या दोन सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात येताच अमिषा हिच्या खासगी आयुष्या चर्चा देखील जोर धरू लागल्या.
आज अमिषा 49 वर्षांची आहे. पण अभिनेत्री अद्यापही अविवाहित आहे. दरम्यान, अमिषा आणि पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. आता यावर खुद्द अभिनेत्री मौन सोडलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अमिषा म्हणाली, ‘रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही…’
मुलाखतीत अमिषाला विचारण्यात आलं की, ‘पकिस्तानी अभिनेता आहे इमरान अब्बास त्याच्यासोबत तुझे काही फोटो व्हायरल झाले होते. लोकांनी फोटो सर्वत्र व्हायरल केले. खरंच अमीषा आता लग्न करणार आहे. यामागचं नक्की कारण काय आहे?’
यावर अमिषा म्हणाली, ‘गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आमच्या नात्याची चर्चा रंगली आहे. लग्न झालं आहे का? आम्ही कार्यक्रमांमध्ये भेटतो. आम्ही चांगले मित्र आहोत. परदेशात कोणतं कार्यक्रम असेल तर आम्ही भेटत. दोन चांगल्या दिसणाऱ्या लोकांना पाहिल्यानंतर अफवा सुरु होतात.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तो देखील सिंगल आहे, मी पण सिंगल आहे. म्हणून लोकांना असं वाटतं की आमचं लग्न व्हायला हवं. त्यानंतर अफवा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरतात.’ असं म्हणजे अमिषा हिने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
कोण आहे इमरान अब्बास?
इमरान अब्बाल पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये देखील इमरान याने काम केलं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रिएचर 3डी’ सिनेमातून अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पाकिस्तानात त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.