
काही दिवसांपासून एका महिला खासदाराच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. सध्या ज्या महिला खासदाराच्या आयुष्याबद्दल चर्चा सुरु आहेत, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही अभिनेत्री कंगना राणौत आहेत… कंगना राणौत या अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी अनेक सिनेमांध्ये दमदार भूमिका साकारली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण कंगना कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. काही वर्षांपूर्वी कंगना यांच्या नावाची चर्चा अभिनेका आदित्य पंचोली यांच्यासोबत रंगल्या होत्या. शिवाय अभिनेता ऋतिक रोशन याच्यासोबत देखील कंगना यांचं नाव जोडण्यात आलं.
अशात कंगना यांना विवाहित आणि मुलं असलेल्या पुरुषांसोबत राहायला आवडतं असं अनेक जण म्हणू लागले. असे गंभीर आरोप अभिनेत्रीवर करण्यात आले. यावर कंगना राणौत यांनी मौन सोडलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
आरोपांचं खंडन करत कंगना म्हणाल्या, ‘जेव्हा तुम्ही जवान आणि महत्वाकांशी असता आणि कोणी विवाहित पुरुष, जो बाप देखील आहे. जर तुमच्याकडे आकर्षित होत असेल तर, लोकं कायम महिलांना दोषी ठरवतात. यामध्ये पुरुषांची कोणतीच चूक मान्य केली जात नाही.’
‘लोकं कायम महिलांना दोषी ठरवतात. ज्या तरुणीवर, महिलेवर बलात्कार झाला आहे तिला देखील कपडे आणि रात्री बाहेर राहिल्यामुळे दोषी ठरवलं जातं… हा फक्त आणि फक्त मानसिकतेचा विषय आहे…’ असं देखील कंगना म्हणाल्या.
कंगना आणि आदित्य पंचोली यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेता ऋतिक रोशन सोबत घटस्फोट झाल्यानंतर कंगना हिने स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठा अभिनेता आदित्य पंचोली याला डेट करण्यास सुरुवात केली. पण आदित्य सोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. कंगना यांनी आदित्यवर अनेक गंभीर आरोप केले.
एका मुलाखतीत कंगना म्हणाल्या होत्या, ‘मी 17 वर्षांची असताना त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिक्स केले आणि कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला. नको त्या अवस्थेत माझे फोटो काढले आणि मला ब्लॅकमेक करत राहिला…’ दोघांचे वाद कोर्टापर्यंत पोहोचले होते.