AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना कपूरने कोणाला म्हणाली, ‘त्यांनी माझ्यासोबत वाईट केलं…’, यावर ‘तो’ पुरुष म्हणाला…

Kareena Kapoor : करीना कपूर हिच्यासोबत घडलेली 'ती' वाईट घटना, म्हणाली, 'त्यांनी माझ्यासोबत प्रचंड वाईट केलं, म्हणून...', 'त्या' पुरुषाने दिलेलं उत्तर हैराण करणारं..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना कपूर हिची चर्चा

करीना कपूरने कोणाला म्हणाली, 'त्यांनी  माझ्यासोबत वाईट केलं...', यावर 'तो' पुरुष म्हणाला...
| Updated on: Aug 17, 2025 | 1:45 PM
Share

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. एवढंच नाही तर, आज लग्न आणि दोन मुलांची आई असून देखील करीना घर आणि करीयर दोन्ही उत्तमरित्या सांभाळते. पण यशाच्या शिखरावर विराजमान होण्याचा अभिनेत्रीचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक चढ – उतार करीना हिने या काळात पाहिले आहे.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना करीना हिने दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यावर गंभीर आरोप केल होता. भन्साळी यांनी करीनाची स्क्रिन टेस्ट घेतली, पण अभिनेत्रीला सिनेमात काम करण्याची संधी दिली नाही. सांगायचं झालं तर, ‘देवदास’ सिनेमात सुरुवातीला अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता शाहरुख खान यांच्याऐवजी सैफ अली खान आणि करीना कपूर यांना कास्ट करण्यात आलं होतं.

सैफ अली खान याची निवड चुन्नीलाल आणि करीनाची निवड पारो याभूमिकेसाठी झाली होती. पण भन्साळी यांनी अचानक ऐश्वर्या आणि शाहरुख यांची मुख्य भुमिकेसाठी निवड केली. तर अभिनेते जॉकी श्रॉफ यांची निवड चुन्नीलाल भुमिकेसाठी केली. भन्साळी यांनी घेतलेल्या निर्णायाचा करीनाला मोठा धक्का बसला.

यावर अभिनेत्रीने निराशा देखील व्यक्त केली होती. अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी ‘देवदास’ सिनेमासाठी माझी स्क्रिन टेस्ट घेतली होती. मला सायनिंग अमाउंट देखील दिलेली. त्यानंतर दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं. हे फार चुकीचं होतं. मला प्रचंड वाईट वाटलं कारण तेव्हा मी करीयरची सुरुवात केली होती.’

‘भन्साळी यांनी घेतलेला निर्णय मला बिलकूल आवडला नव्हता… त्यानंतर मी ठरवलं माझ्याकडे काम नसेल तरी चालेल पण यापुढे कधीच संजय लिला भन्साळी यांच्यासोबत काम करणार नाही…’ असं देखील करीना एका मुलाखतीत म्हणाली होती.

दरम्यान, याबद्दल संजय भन्साळी यांना देखील विचारण्यात आलं होतं. यावर भन्साळी म्हणाले, ‘करीना हिची सिनेमासाठी स्क्रिन टेस्ट घेतली होती. पण याचा अर्थ असा होत नाही, मी तिला सिनेमासाठी साईन केलं आहे…’, त्यानंतर भन्साळी यांच्या कोणत्याच सिनेमात करीना दिसली नाही…

‘देवदास’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख आणि ऐश्वर्या यांची सिनेमातील केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमातील गाण्यांना देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आजही सिनेमातील गाणी लोकप्रिय आहेत.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा