AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौतच्या कानशिलात; अभिनेत्री म्हणाली, ‘दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करणारे तुमच्यासोबत…’

Kangna Ranaut | 'दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करणारे तुमच्यासोबत...', विमानतळावर झालेल्या वादग्रस्त प्रकरणानंतर कोणावर भडकली कंगना रनौत? अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा...

कंगना रनौतच्या कानशिलात; अभिनेत्री म्हणाली, 'दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करणारे तुमच्यासोबत...'
| Updated on: Jun 07, 2024 | 2:01 PM
Share

अभिनेत्रा कंगना रनौत आणि खसदार कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असते. गुरुवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका महिला कॉन्स्टेबलने चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावली आणि शिवीगाळ देखील केली. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. ज्यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. आता कंगना हिने स्वतःसोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर कंगना हिच्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध करण्यात येत आहे. पण अद्याप सिनेविश्वातून कोणीच अभिनेत्रीच्या बाजूने उभं राहिलेलं नाही. ज्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली. पण अभिनेत्रीने पोस्ट डिलिट देखील केली आहे.

बॉलिवूडवर संताप व्यक्त करत म्हणाली, ‘प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही सर्वजण विमानतळावर माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहात, किंवा मग तुम्ही मौन बाळगलं आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उद्या जर तुम्ही आपल्या देशात कोणत्या रस्त्यावर चालत आहात आणि तेव्हा कोणी इस्रायली/पॅलेस्टिनी तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला करतात… कारण तुम्ही राफासाठी उभे आहात…

मग तुम्हाला दिसेल की मी तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढणार… ‘ऑल आइज ऑन राफा’ हे तुमच्या मुलांसोबत देखील होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करताय, तर त्या दिवसासाठी तयार राहा… जेव्हा तुमच्यासोबत देखील हे सगळं होऊ शकतं… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

दरम्यान, महिला कॉन्स्टेबलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ 2020 मधील आहे. जेव्हा कंगना शेतकरी आंदोलनासाठी आक्रमक झाली होती. अभिनेत्री म्हणाली होती, ‘शेतकरी आंदोलनात आंदोलन करणाऱ्या महिलांना 100-200 रुपये दिले जातात… त्या आंदोलनात महिला कॉन्स्टेबलच्या आई देखील होत्या. सध्या संबंधीत प्रकरणी सर्वत्र चर्चा होत आहे.

हल्ला झाल्यानंतर काय म्हणाली कंगना?

विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली “दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने माझ्या कामशिलात लगावली आणि मला  शिवीगाळ केली. मी कारण विचारल्यानंतर ती म्हणाली, तिने मला ती शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचं सांगितलं.’ सध्या सर्वत्र कंगना हिची चर्चा रंगली आहे.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.