AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोण हिच्या बाळाचे रणबीर कपूरसोबत कनेक्शन, थेट चर्चा, अभिनेत्याची…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोण हिने नुकताच एका मुलीला जन्म दिलाय. तशी पोस्टही दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये.

दीपिका पादुकोण हिच्या बाळाचे रणबीर कपूरसोबत कनेक्शन, थेट चर्चा, अभिनेत्याची...
Deepika Padukone
| Updated on: Sep 08, 2024 | 5:20 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दीपिका पादुकोणची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिने आज 8 सप्टेंबर 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. दीपिका पादुकोण ही कालच रूग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर तिच्या डिलीवरीच्या विविध चर्चा या रंगताना दिसल्या. आज दीपिकाने मुलीला जन्म दिलाय. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणवीर सिंह याने मुलगी पाहिजे, असे म्हटले होते आणि आज खरोखरच दीपिका पादुकोण हिने मुलीला जन्म दिला.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत पोहोचली होती. यावेळी ती बनारसी साडीमध्ये दिसली. विशेष म्हणजे सिद्धीविनायक मंदिरात परवाच दीपिका आली आणि आजच तिने मुलीला जन्म दिलाय. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याचे जाहीर केले.

दीपिका पादुकोण हिने शेअर केलेल्या पोस्टनंतर सर्वजण तिला शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत. दीपिका पादुकोण हिने मुलीला जन्म दिल्यानंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, रणबीर कपूर याचा लकी नंबर हा 8 आहे. हेच नाही तर रणबीर कपूर हा कायमच 8 नंबरची जर्सी घालून फुटबॉल खेळतो.

बऱ्याच वेळा रणबीर कपूर याच्याकडून देखील सांगितले गेले की, त्याचा लकी नंबर हा 8 आहे. त्यामध्येच आता दीपिका पादुकोण हिने देखील 8 सप्टेंबरलाच बाळाला जन्म दिलाय. यामुळेच विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. रणवीर सिंह याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर दीपिका पादुकोण ही रणबीर कपूर याला डेट करत होती. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाले.

लग्न होऊन सहा वर्षानंतर दीपिका पादुकोण हिने बाळाला जन्म दिलाय. काही महिन्यांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आणि लवकरच बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले गेले. आता मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे नव्या आणि आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...