Fatima Sana Shaikh | 3 वर्षांची असताना ‘शोषणा’ची बळी ठरले, ‘दंगल गर्ल’चा खळबळजनक गौप्यस्फोट

‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटानंतर बॉलिवूडमधल्या महत्त्वाच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाऊ लागले आहे.

Fatima Sana Shaikh | 3 वर्षांची असताना ‘शोषणा’ची बळी ठरले, ‘दंगल गर्ल’चा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने (Actress Fatima Sana Shaikh) अवघ्या काही वर्षांतच चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटानंतर बॉलिवूडमधल्या महत्त्वाच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाऊ लागले आहे. ‘दंगल’नंतर ती बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये झळकली होती. आता लवकरच ती पुन्हा एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान तिने तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट घटनांचा उलगडा केला आहे. 3 वर्षांची असताना शोषणाची बळी ठरल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट फातिमाने केला आहे.(Bollywood Actress Fatima Sana Shaikh open up about harassment)

अभिनेत्री फातिमा सना शेख लवकरच ‘लुडो’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान तिने एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान फातिमाने तिच्या संघर्षाशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. ‘मी आजपर्यंतच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला आहे. चित्रपट मिळविणेसुद्धा माझ्यासाठी कधीच सोपे नव्हते’, असे तिने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.

या घटना कलंकासारख्या असतात..

याच मुलाखतीत तिने अनेक धक्कादायक गौप्यस्फोटदेखील केले आहेत. ‘केवळ 3 वर्षांची असताना माझा विनयभंग झाला होता. अशा घटना स्त्रियांच्या आयुष्यात कलंकासारख्या असतात. त्या कधीच या घटनांबद्दल बोलत नाहीत.परंतु, आता जमाना बदलला आहे. लैंगिक छळाबद्दल आता देशभर आणि जगभरात जागरूकता वाढली आहे. मात्र, पूर्वी या गोष्टी सांगणे लोकांना चुकीचे वाटायचे. म्हणून या गोष्टी बाहेर येऊ नयेत यासाठी दबाव टाकला जायचा’, असे फातिमा सना शेख म्हणाली.(Bollywood Actress Fatima Sana Shaikh open up about harassment)

कास्टिंग काऊचमुळे अनेक चित्रपट हातून गेले…

यावेळी तिने कास्टिंग काऊच प्रकरणावरदेखील भाष्य केले. कास्टिंग काऊचबद्दल बोलताना फातिमा म्हणाली की, ‘मलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. आयुष्यात अशीही एक वेळ आली होती, जेव्हा असे सांगण्यात आले की, जर शरीरसंबध ठेवले तरच तेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होत असतो.’

‘यामुळे, बर्‍याचदा असेही घडले आहे की, चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक संधी माझ्या हातातून गेल्या आहेत. मी एखाद्या चित्रपटाचा भाग आहे आणि अचानक मला त्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आल्याचे प्रकारही बऱ्याचदा घडले आहेत. तिथे माझ्या जागी वशिलेबाजी करून आलेल्या कोणाची तरी वर्णी लागायची आणि मला काढून टाकले जायचे’, असे म्हणत तिने आपल्या आयुष्यातील वाईट घटनांबद्दलचे दुःखदेखील व्यक्त केले.(Bollywood Actress Fatima Sana Shaikh open up about harassment)

अभिनेत्री फातिमा सना शेख बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. बऱ्याच चित्रपटांत ती बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली आहे. गेल्या दोन दशकांपासून ती या इंडस्ट्रीचा भाग आहे. ‘इश्क’, ‘चाची 420’, ‘वन टू का फोर’ आणि ‘बडे दिलवाला’ या चित्रपटांमध्ये ती बाल कलाकार म्हणून दिसली होती.

आमिर खानच्या 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर ती ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता लवकरच ती ‘लुडो’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Bollywood Actress Fatima Sana Shaikh open up about harassment)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *