मुस्लिम पुरुषाशी लग्नाचा अभिनेत्रीला पश्चाताप, आजारपणातही करयाचा शारीरिक छळ, आता दोन मुलांसोबत जगतेय असं आयुष्य

Actress Love Life: मुस्लिम पुरुषावर प्रेम त्यानंतर लग्न... लग्नाचा अभिनेत्रीला पश्चाताप, आजारपणातही करयाचा शारीरिक छळ, दोन घटस्फोट झाल्यानंतर दोन मुलांसोबत कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री?

मुस्लिम पुरुषाशी लग्नाचा अभिनेत्रीला पश्चाताप, आजारपणातही करयाचा शारीरिक छळ, आता दोन मुलांसोबत जगतेय असं आयुष्य
| Updated on: Apr 07, 2025 | 3:42 PM

Actress Love Life: झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी लग्नाआधी काही वर्ष एकमेकांना डेट करतात आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतात. पण अनेकदा विचार करुन घेतलेला निर्णय देखील चुकीचा ठरतो. असं काही एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत झालं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे तिने एक नाही दोन लग्न केलं. पण अभिनेत्रीची दोन्ह लग्न अपयशी ठरली. आज दोन घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलांसोबत एकटीच आयुष्य जगते.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी चाहत खन्ना आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं. पण अभिनेत्रीची लोकप्रियता फार काळ टिकली नाही.

चाहत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. चाहत हिने वयाच्या 20 व्या वर्षी भरत नरसिंघानी याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने पहिल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या घटस्फोटानंतर चाहत हिने 2013 मध्ये फरहान मिर्झा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. फारहान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने दुसऱ्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामुळे अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं.

 

 

दुसऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप करत अभिनेत्री म्हणाली, ‘फरहान मला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा… प्रकृती ठिक नसताना देखील तो शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला माझ्या जीवाची काहीही पर्वा नव्हती.’ सांगायचं झालं तर, दुसऱ्या घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

चाहतच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2002 मध्ये कॅडबरीच्या जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर चाहत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसली. अखेर 2005 मध्ये अभिनेत्री प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत वाढ झाली. 2005 मध्ये अभिनेत्रीला ‘हीरो – भक्ती ही शक्ती’ मध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

चाहत हिने ‘काजल’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘कुबूल है’ आणि ‘डर सबको लगता है’ यांसारख्या मालिकांमध्ये अभिनेत्री झळकली. अनेक सिनेमांमध्ये देखील चाहत हिने काम केलं आहे. में ‘7½ फेरे’, ‘एक मैं एक तुम’, ‘थैंक्यू’, ‘प्रस्थानम’ आणि ‘यात्रीज’ सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं.