Kareena Kapoor | करीना कपूर हिने व्यक्ती केली मोठी इच्छा, थेट म्हणाली, सैफ अली खान याच्यासोबत करायचे…
करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर हिची जोरदार फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर हिने आपल्या करिअरची सुरूवात 2000 मध्ये केली. शाहिद कपूर याला डेट करताना करीना कपूर दिसली.

मुंबई : करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिचा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच अत्यंत खासप्रकारे साजरा करण्यात आला. करीना कपूर खान हिच्या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ (Video) हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यामध्ये करीना कपूर खान ही धमाका करताना दिसली. करीना कपूर खान ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर खान ही दिसते.
काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान ही आपल्या दोन मुलांसह आणि सैफ अली खान याच्यासोबत विदेशात धमाल करताना दिसली. इतकेच नाही तर यावेळी ते जंगलात फिरताना दिसले. करीना कपूर खान ही आपल्या कामामधून वेळ काढून कायमच आपल्या कुटुंबासोबत फिरताना दिसते. करीना कपूर खान ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.
नुकताच आता करीना कपूर खान हिने मोठी इच्छा व्यक्त केलीये. करीना कपूर खान हिला पती सैफ अली खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करायची आहे. सैफ अली खान हिच्यासोबत चित्रपटात काम करण्याची थेट इच्छा तिने बोलून दाखवली. करीना कपूर खान म्हणाली की, जगातील सर्वात आवडतीचा माझा व्यक्ती सैफ अली खान हाच आहे.
पुढे करीना कपूर म्हणाली की, मला सैफ अली खान याच्यासोबत बॉन्ड शेअर करायला, त्याच्यासोबत राहिला आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला प्रचंड आवडते. करीना कपूर हिने स्पष्ट केले की, सैफ अली खान हा खूप जास्त चांगला अभिनेता आहे, यामुळेच मला त्याच्यासोबत काम करायचे आहे. करीना कपूर खान ही कायमच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते.
करीना कपूर हिने आलिया भट्ट हिच्यासोबत एक खास फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्या दोघींना एका चित्रपटात काम करायचे आहे. आम्हाला कोणीतरी काम द्या. यानंतर चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले. करीना कपूर हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा जबरदस्त लूक दिसत होता.
