AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘त्या’ दिवसानंतर करीना कपूर हिने किसिंग सीनसाठी दिला नकार, कारण…

Kareena Kapoor | ‘ओमकारा’ सिनेमानंतर करीना कपूर हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत किसिंग सीनसाठी दिला नकार, तेव्हा नक्की झालं तरी काय? अनेक अभिनेत्यांसोबत करीना हिने स्क्रिन शेअर केली आहे. आज करीना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही...

Kareena Kapoor | 'त्या' दिवसानंतर करीना कपूर हिने किसिंग सीनसाठी दिला नकार, कारण...
| Updated on: Sep 25, 2023 | 2:21 PM
Share

मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | ‘हिरोईन’, ‘जब व्ही मेट’, ‘3 इडियट्स’, ‘जाने जान’, ‘रा.वन’, ‘गूड न्यज’, ‘डॉन’ यांसरख्या एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री करीना कपूर हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री ‘जानेजान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या माध्यमातून करीना हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. सिनेमात अभिनेत्रीचे अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत काही इंटिमेट सीन असल्याची देखील चर्चा रंगली. पण एक काळ असा होता, जेव्हा करीना हिने किसिंग सीनसाठी नकार दिला होता. ‘ओमकारा’ सिनेमानंतर करीना कपूर हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत किसिंग सीनसाठी नकार दिला होता.

स्क्रिप्टच्या गरजेनुसार २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमात अजय सोबत किसिंग सीन द्यायचा होता. पण तेव्हा अभिनेत्री किसिंग सीनसाठी नकार दिला होता. ‘सत्याग्रह’ सिनेमात अजयसोबत ‘किसिंग सीन’ करणं अभिनेत्रीला योग्य वाटत नव्हतं म्हणून तिने नकार दिला.

‘ओमकारा’ सिनेमात इंटिमेट सीन करण्यास अभिनेत्रीचा हरकत नव्हती, पण १६ ऑक्टोबर २०१२ साला अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीनाने किसिंग आणि इंटिमेट सीन करण्यास नकार दिला. लग्नानंतर करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांतं मनोरंजन केलं.

सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानतंर करीना हिने किसिंग सीनसाठी नकार दिला. किसिंग सीनसाठी करीना हिचा नकार असल्यामुळे प्रकाश झा यांना सिनेमात महत्त्वाचे बदल करावे लागले. याआधी अभिनेता इमरान हाशमी याच्यासोबत ‘बदतमीज दिल’ सिनेमात देखीस किसिंग सीन करण्यास नकार दिला होता.

नुकताच करीना हिने वाढदिवस साजरा केला. तेव्हा देखील सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या. सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. लग्नानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म दिला. करीना हिच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर अली खान आहे, तर लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे…

सोशल मीडियावर देखील करीना कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.