Karisma Kapoor : करिश्माच्या भन्नाट बिझनेस आयडिया… महिन्याला लाखोंची कमाई… जाणून घ्या सीक्रेट

Karisma Kapoor : पूर्व पतीच्या संपत्तीच्या वादामुळे करिश्मा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. पण अभिनेत्रीकडे बिझनेसच्या अशा भन्नाट आयडिया आहेत, ज्यामुळे अभिनेत्री महिन्याल लाखोंची कमाई करते... जाणून घ्या तिचं टॉप सिक्रेट

Karisma Kapoor : करिश्माच्या भन्नाट बिझनेस आयडिया... महिन्याला लाखोंची कमाई... जाणून घ्या सीक्रेट
करिश्मा कपूर
Updated on: Nov 22, 2025 | 12:15 PM

Karisma Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर पूर्व पती संजय कपूर याच्या निधनानंतर तुफान चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे, तरी देखील महिन्याला लाखोंची कमाई करते… करिश्मा कपूरने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील तिचं आलिशान अपार्टमेंट भाड्याने देऊन रिअल इस्टेट मार्केटमध्ये आणखी एक हाई-वॅल्यू डील केली आहे. रिपोर्टनुसार, संबंधित भाडे करार नोव्हेंबर 2025 मध्ये रजिस्टर करण्यात आलं आहे. तर यासाठी महिन्याला 5 लाख 51 हजार रुपये अभिनेत्रीला भाडं म्हणून मिळणार आहे… करिश्मा ही केवळ सिने जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाही तर तिची गणना मुंबईतील आघाडीच्या मालमत्ता गुंतवणूकदारांमध्ये देखील होते, म्हणूनच तिचा कोणताही करार चर्चेचा विषय बनतो.

वांद्रे पश्चिमेकडील हिल रोडवरील ग्रँड बे कॉन्डोमिनियम ही आधीच एक हाय-प्रोफाइल सोसायटी मानली जाते. करिश्माचा आलिशान फ्लॅट, जो तिने भाड्याने दिला आहे, तो याच सोसायटीत आहे. सुमारे दोन हजार दोनशे चौरस फूट क्षेत्रफळाचे हे अपार्टमेंट त्याच्या कार्पेट एरिया, तीन वाहनांसाठी खाजगी पार्किंग आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या कॉम्प्लेक्समुळे एक वेगळी ओळख निर्माण करते. या व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी, स्टांप ड्यूटी, नोंदणी शुल्क आणि 20 लाख रुपयांची सिक्योरिटी डिपॉजिट देखील जमा करण्यात आली.

 

 

एका वर्षात 66 लाखांपेक्षा अधिक कमाई…

हा करार एक वर्षासाठी करण्यात आली. ज्यामुळे एका वर्षांत करिश्मा फक्त एका फ्लॅटमुळे तब्बल 66 लाखांपेक्षा अधिक कमाई करेल… मुंबईच्या लक्झरी भाडे बाजारात ही एक मोठी रक्कम मानली जाते. वांद्रे सारख्या भागात, असे अपार्टमेंट बहुतेकदा मोठ्या सेलिब्रिटी आणि उद्योगाशी संबंधित लोकांमध्ये लवकर भाड्याने दिले जातात.

वांद्रे पश्चिम परिसर का आहे खास?

वांद्रे पश्चिम मुंबईतील सर्वात स्टायलिश आणि प्रतिष्ठित परिसर मानला जातो… बीकेसी जवळच असल्यामुळे येथील कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो लाईन सहज पोहोचण्याच्या आत आहे. एवढंच नाही तर, कॅफे, रेस्टॉरंट्स, जिम, क्लबहाऊस आणि बँडस्टँड यासारखी ठिकाणं या भागातील जीवनशैली अत्यंत आकर्षक बनवतात. याच कारणामुळए येथील मालमत्तांची मागणी श्रीमंत लोकांमध्ये नेहमीच जास्त असते.