AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईपेक्षा अधिक ग्लॅमरस करिश्मा कपूरची लेक, हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

Karisma Kapoor Daughter : करिश्मा कपूर हिच्या लेकीच्या अदांवर चाहते फिदा... समायरा कपूर हिचं हटके ट्रांसफॉर्मेशन, लोलोच्या लेकीवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा... फोटो पाहून व्हाल थक्क...

आईपेक्षा अधिक ग्लॅमरस करिश्मा कपूरची लेक, हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
| Updated on: Nov 08, 2024 | 3:43 PM
Share

Karisma Kapoor Daughter : अभिनेत्री करिश्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास कारणामुळे चर्चेत आली आहे. आता करिश्मा कपूर तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे नााही तर, लेकीच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. सध्या करिश्मा कपूर हिच्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय अभिनेत्री मुलगी आणि मुलासोबत देखील फोटो पोस्ट करत असते.

सध्या सोशल मीडियावर करिश्माच्या लेकीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये करिश्मा हिने लेक समायरा हिच्यासोबत खास पोज दिली आहे. समायरा हिचा हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील हैराण झाले आहे. समायरा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा देखील जोर धरत आहे. पण यावर कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

समायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, समायरा 18 वर्षांची झाली आहे. समायरा तिच्या आईपेक्षा देखील अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये करिश्मा आणि समायरा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. सध्या दोघींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

समायरा कपूर हिचा फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील चक्क झाले आहे. एक नेटकरी लोलोच्या लेकीच्या फोटोवर कमेंट करक म्हणाला, , ‘कपूर कुटुंबातील सर्वात सुंदर मुलगी..’, अन्य एक नेटकरी म्हणाली, ‘लोलोची कार्बन कॉपी…’ समायरा कपूर हिचं सौंदर्य पाहिल्यानंतर अनेकांना समायरा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार? असे प्रश्न देखील विचारले आहेत.

समायरा कपूर ही करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मोठी मुलगी आहे. दोघांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर करिश्मा सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. सांगायचं झालं तर, करिश्मा दुसरं लग्न करणार? आजही अभिनेत्री असा प्रश्न चाहते विचारत असतात. पण अभिनेत्रीने पहिल्या घटस्फोटानंतर कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री दोन्ही मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्मा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.