
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. मलायका हिला फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळेच नाही तर, तिच्या आयटम सॉग्न्समुळे देखील ट्रोल केलं जातं. आता यावर मलायका हिने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयटम सॉग्नबद्दल मलायका अरोरा म्हणाली, ‘खरंच याबद्दल मला लाज वाटली पाहिजे? म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टींसाठी ट्रोल केलं जातं… पण मला नाही वाटतं यात कोणती मोठी गोष्ट आहे… डान्स एक भावना आहे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे…’
पुढे मलायका म्हणजे, ‘मी खरंच आभारी आहे कारण वयाच्या 52 व्या वर्षी मी डान्स करु शकत आहे… मी काही तरी चांगलंच करत आहे… डान्स केल्याने मला एक नवीन ऊर्जा मिळते… आणि खरंच मला खूप चांगलं वाटतं…’ असं देखील मलायका म्हणाली.
सांगायचं झालं तर, 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्याा ‘चिलगम’ गाण्यात मलायका हिने भन्नाट डान्स केलेला. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘चिलगममध्ये काम करणं एक चांगला अनुभव होता… यो यो हनी सिंग ग्रेट आहे..’, गाण्यातील काही स्टेप्समुळे मलायका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
मिस्ट्री मॅनसोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चांवर देखील मलायका हिने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी कोणत्याही पुरुषासोबत स्पॉट झाली तरी अफेअरच्या चर्चा रंगतात. माझा मॅनेजर, मित्र, गे मित्र, किंवा कोणता विवाहित पुरुष माझ्यासोबत दिसला की रिलेशनशिपच्या चर्चा रंगतात. यावर माझी आई मला विचारते, तुझं आता कोणासोबत नाव जोडलं जात आहे. या सर्व गोष्टी ऐकून – वाचून आम्हाला खूप हसायला येतं…’ असं देखील मलायका अरोरा म्हणाली.