
Rashmika Mandana Flaunts Diamond Ring: साऊथ सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपलं नाव मोठं करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका मंदाना हिची चर्चा रंगली आहे. सध्या रश्मिका हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये रश्मिका तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे… अशात रश्मिका हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे का? अशा चर्चा चाहते आणि सोशल मीडियावर रंगल्या आहे. तर अभिनेत्री हिचा साखरपुडा अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत झाला असल्याचं देखील अनेकांचं म्हणणं आहे…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले रश्मिका मंदानाचे हे फोटो दुबई विमानतळ येथील आहेत. जिथे ती साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) 2025 साठी पोहोचली होती. फोटोमध्ये रश्मिता कॅजुअल लूकमध्ये दिसत आहे… पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाईझ टीशर्ट आणि निळ्या रंगाच्या जिन्समध्ये अभिनेत्रीला स्पॉट करण्यात आलं.
विमानतळावर खास लूकमध्ये अभिनेत्री दिसली. पण रश्मिकाच्या बोटात असलेल्या अंगठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या रश्मिका हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही, रश्मिका हिने बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा याच्यासोबत साखरपुडा केल्याच्या देखील चर्चा सुरु आहे. पण यावर अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही…
Touchdown Dubai! @iamRashmika is all set to dazzle at @siima Awards 2025 ✨ #SIIMA2025 #RashmikaMandanna pic.twitter.com/03GxIUIRf7
— Rashmika Trends (@RashmikaTrends) September 5, 2025
गेल्या काही वर्षांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत आहे… असं अनेकदा समोर आलं. दोघांना अनेकदा पार्टी आणि लंच दरम्यान एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या रिलेशनशिपची कबुली सर्वांसमोर दिलेली नाही.
दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता विजय देवरकोंडा ‘किंगडम’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. तर रश्मिका लवकरच ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘थामा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.