ये इस्लाम में हराम है…, मुस्लिम नवऱ्यासोबत गणपती मंडळात पोहोचली स्वरा भास्कर, वादाला फुटलं तोंड
Swara Bhaskar Video: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भस्कर नुकताच नवरा फहाद याच्यासोबत गणपती मंडळात गणरायाचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. सध्या अभिनेत्रीचा तिच्या कुटुंबासोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पण अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Swara Bhaskar Video: मोठ्या थाटात अनेकांना गणरायाचं स्वागत केलं आणि शनिवारी जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला. या 10 दिवसांमध्ये मध्ये सर्वसामान्य लोकांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील वेगवेगळ्या गणपती मंडळात जावून दर्शन आणि आशीर्वाद घेतलं. अभिनेत्री स्वरा भास्कर देखील पकी फहाद अहमद आणि लेक राबिया हिच्यासोबत गणपती मंडळात पोहोचली. त्याचा एक व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे. पण नेटकऱ्यांनी अभिनेत्री ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
स्वरा हिने पती फहाद याच्यासोबत घेतलं गणरायाचं दर्शन
स्वरा भास्कर हिने व्हिडीओ सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्वरा हिरव्या साडीमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीसोबत पती आणि मुलगी देखील आहे. तिघांनी गणपती मंडळात जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेतले… यादरम्यान, पती – पत्नीने बाप्पाच्या मूर्तीची पूजा आणि प्रसाद अर्पण करताना दिसले. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलं, ‘गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या….’ यावेळी अभिनेत्रीने फहादसोबत अनुशक्ती नगरच्या अनेक मंडळांना भेट दिली आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले..’
View this post on Instagram
धर्मावरून स्वराला करण्यात आलं ट्रोल…
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद याच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं. तर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. मुस्लिम पतीसोबत गणपती मंडळात पोहोचलेल्या स्वरा भास्कर हिला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘फहाद याला सांगा इस्लाममध्ये मुर्तीची पूजा करणं हराम आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मुसलमान नावावर कलंक आहे…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘कट्टरपंथी मुस्लिमांच्या कमेंट पहा…’’
कधी झालं फहाद आणि स्वरा यांचं लग्न?
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी 2023 मध्ये कोर्ट मॅरेज केलं. आज हे दोघे एका मुलीचे आई – वडील आहेत. त्यांनी मुलीचं नाव राबिया ठेवलं आहे. अभिनेत्री कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर स्वरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
