अंडरवर्ल्ड डॉनवर प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, परदेशात जावून केली धुणीभांडी आणि…
Actress Love with Don: अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली धुणीभांडी करण्याची वेळ..., भोगला तुरुंगवास..., आज जगतेय असं आयुष्य.., अभिनेत्रीने झालेल्या पश्चाताप

Actress Love with Don: असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ आहे… पण प्रेम अंधळं असेल तर, त्याचे परिणाम देखील फार वाईट होतात. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे, ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे… ती व्यक्ती खरंच आपल्या योग्य आहे का? हे देखील फार महत्त्वाचं असतं. नाहीतर, फार मोठा पश्चाताप होतो. असंच काही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉनवर प्रेम केल्यामुळे अभिनेत्रीला एक वर्ष तुरुंगवास देखील भोगावा लागला…
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे त्या अभिनेत्रीचं नाव मोनिका बेदी असं आहे. एक काळ असा होता, जेव्हा मोनिका हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होते. अशात अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम देखील मोनिका हिच्यावर फिदा झाला आणि दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली.
असं म्हणतात की, अबू सलेम याचं मोनिका हिच्यावर प्रचंड प्रेम होतं. दोघं एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. अबू सलेम याच्यावर आसलेल्या प्रेमाखातर मोनिका हिने भारत आणि बॉलिवूडला निरोप दिला. त्यानंतर अभिनेत्री अबू सलेम याच्यासोबत राहू लागली.
येथूनच मोनिकाच्या आयुष्यातील वाईट दिवसांची सुरुवात झाली. एका मुलाखतीत मोनिका हिने अबू सलेम याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुम्हाला चांगलं वाईट काहीही कळत नाही… तुमच्या डोळ्यावर त्या व्यक्तीने प्रेमाची पट्टी बांधलेली असते.’
‘पोर्तुगाल येथे जेव्हा मी त्याच्या विरोधातील चार्जशीट वाचली तेव्हा मला मोठा धक्का बसला. असं नाही की, मला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. अधिकारी त्याचा पाठगाल करत आहेत… अबू सलेम याच्याकडे पैसा होता, त्यामुळे सर्वांना असं वाटत होतं की, मी एका राजकुमारी सारखं जगत आहे… पण त्याच्यासोबत मी अत्यंत कठीण दिवस पाहिले आहेत.’
‘मी त्याच्यासाठी जेवण केलं आहे. त्याचे कपडे धुतले आहेत… एवढंच नाही तर, भांडी देखील घासली आहे… मी चांगलं आयुष्य पाहिलं असेल तर, ते फक्त माझ्या आई – वडिलांच्या घरात… त्यानंतर जेव्हा स्वतः पैसे कमावू लागली… लोक म्हणायचे, मी पैशांसाठी अबू सलेम याच्यासोबत आहे… मला कळलंच नाही की, या सर्व घटनेत मी कशी अडकली…’
मोनिकाने सांगितलं की, तिला माहित नव्हतं की तो अबू सालेम आहे. त्याने मला त्याचं नाव अरसलान अली सांगितलं आणि काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मला सत्य कळलं. जर मला आधी माहित असतं तर मी स्वतःहून निघून गेली असती… असं देखील मोनिका म्हणाली.
