AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजघराण्यातील ‘या’ अभिनेत्रीचा तो व्हिडीओ लीक, गंभीर आरोप आणि थेट बॉलिवूडमधूनही…

बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये धमाकेदार भूमिका करतात आणि एक वेगळी ओळख निर्माण करतात. मात्र, अवघ्या काही वर्षांमध्ये त्या मोठ्या पडद्याच्या दूर जातात आणि परत त्या कधीच मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

राजघराण्यातील 'या' अभिनेत्रीचा तो व्हिडीओ लीक, गंभीर आरोप आणि थेट बॉलिवूडमधूनही...
Riya Sen
| Updated on: Aug 03, 2024 | 6:26 PM
Share

राजघराण्यातील मुलीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आणि मोठा धमाका केला. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. मात्र, यशाच्या शिखरावर असताना असे काही घडले की, अभिनेत्रीचे करिअर खराब झाले. आता ही अभिनेत्री टीव्ही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून रिया सेन ही आहे. रिया सेनने आपल्या करिअरची सुरूवात वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर तिने अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या. विषकन्या सारख्या चित्रपटांमधून तिला खरी ओळख मिळाली. 

विशेष म्हणजे रिया सेनचा राजघराण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. रिया सेन हिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. हेच नाही तर कूच बिहारच्या राजकुमारी इला देवी यांचे ते पुत्र आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे पुतणे आहेत. सुचित्रा सेन या देखील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या, त्यांची बहीण रायमा सेन देखील अभिनेत्री आहे.

अक्षय खन्ना आणि लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत रिया सेन हिचे नाव जोडले गेले होते. हेच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू श्रीशांत याला रिया सेन डेट करत असल्याचे मध्यंतरी सांगितले गेले. मात्र, रिया सेन हिचा एक एमएमएस लीक झाला आणि मोठी खळबळ निर्माण झाली. लोकांनी थेट रिया सेन हिच्यावर टीका केली आणि गंभीर आरोपही केला. 

रिया सेन आणि अभिनेता अश्मित पटेल यांचा एमएमएस लीक झाला. हा एमएमएस अत्यंत खासगी होता. असा एक आरोप करण्यात आला की, रिया सेन हिने हा एमएमएस मुद्दाम लीक केला. यानंतर रिया सेनच्या करिअरचा आलेख इतका जास्त घसरला की, रिया सेन हिला काम देण्यासाठीही कोणीही पुढे आले नाही. 

शेवटी रिया सेन हिने ऑगस्ट 2017 मध्ये शिवम तिवारी याच्यासोबत लग्न केले. हा विवाहसोहळा बंगाली पद्धतीने झाला. रिया सेन ही 43 वर्षांची असून अत्यंत बोल्ड दिसते. विशेष म्हणजे रिया सेन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. रिया सेन हिचा एक एमएमएस लीक झाला आणि सर्व करिअर खराब झाले. 

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं