AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan | वडील मुस्लिम आणि आई हिंदू, सारा अली खान करते ‘या’ धर्माचे पालन

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. सारा अली खान हिचा आजच चित्रपट रिलीज झालाय. सारा अली खान ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. सारा अली खान हिचा भाऊ इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Sara Ali Khan | वडील मुस्लिम आणि आई हिंदू, सारा अली खान करते 'या' धर्माचे पालन
| Updated on: Jun 02, 2023 | 6:56 PM
Share

मुंबई : सैफ अली खान याची लेक सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत राहते. सार अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट आजच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान ही दिसली होती. सारा अली खान ही काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे (Movie) प्रमोशन करत असताना अजमेर शरीफ दर्गामध्ये गेली होती. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वीच राजस्थान येथे विकी काैशल याच्यासोबत धमाल करताना सारा अली खान ही दिसली होती. सारा हिचे काही गुपिते उघड करताना देखील विकी काैशल (Vicky Kaishal) हा दिसला होता. सारा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.

चित्रपटाचे प्रमोशन करताना सारा अली खान ही अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेताना दिसली. याचे अनेक फोटोही व्हायरल झाले. मात्र, मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्यामुळे सतत सारा अली खान हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सारा अली खान हिचे मंदिरात जाणे काही लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे.

इतकेच नाही तर अनेकांनी तिला थेट कमेंट करत तिच्या धर्माबद्दल देखील विचारले आहे. मात्र, असे नाही की, सारा अली खान ही पहिल्यांदा कोणत्या मंदिरात वगैरे गेली आहे. जर आपण सारा अली खान हिचे इंस्टाग्राम चेक केले तर आपल्या लक्षात नक्कीच येईल, की सारा अली खान ही अनेकदा यापूर्वी हिंदू मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलीये.

गुरुद्वारा, मंदिरे आणि दर्गात सारा अली खान ही नेहमीच जाते. अनेकांनी थेट म्हटले आहे की, सारा अली खान ही मुस्लीम असून हिंदू मंदिरामध्ये नेमकी कशी जाते. सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. साराची आई हिंदू असल्यामुळे सारा मंदिरात जात असल्याचे सांगितले जाते. सारा दर्गात देखील कायमच जाते.

अमृता सिंह यांनी सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर धर्म बदलला होता. सारा अली खान ही बिनधास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान हिचे नाव हे क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे. सारा अली खान ही काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षाने प्रवास करताना दिसली होती. सारा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.