खूप हलके वाटतेय;अभिनेत्रीने काढले ब्रेस्ट इम्प्लांट, 825 ग्रॅम सिलिकॉन काढल्यावरचा लूक व्हायरल

एका बॉलिवूड अभिनेत्रीने ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहे. तिने सर्जरी केल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा नवा लूक पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

खूप हलके वाटतेय;अभिनेत्रीने काढले ब्रेस्ट इम्प्लांट, 825 ग्रॅम सिलिकॉन काढल्यावरचा लूक व्हायरल
Bollywood Actress
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 16, 2025 | 3:44 PM

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही अभिनेत्री या कोणत्याही सर्जरी शिवाय अतिशय सुंदर दिसतात. त्या अनेकदा विना मेकअप फिरताना देखील दिसतात. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. काही अभिनेत्री तर अशा आहेत ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली आहे. या सर्जरीमुळे त्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. तरीही अभिनेत्री ही सर्जरी करतात. पण आता एका अभिनेत्रीने ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्यासाठी सर्जरी केली आहे.

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती शर्लिन चोप्रा आहे. शर्लिन चोप्राने अलीकडेच ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तिने रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला आणि याबद्दल सांगितले. आता तिची ब्रेस्ट इम्प्लांट रिमूवल शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिने आपल्या नव्या अवताराचे फोटो आणि व्हिडीओही शेअर केले. तिच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रेस्ट सिलिकॉन शस्त्रक्रियेमुळे तिला खूप वेदना सहन कराव्या लागत होत्या. म्हणून तिने ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि नैसर्गिक लुक परत आणला. यासोबतच शर्लिन चोप्राचा नवा लुक पाहून चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शर्लिन चोप्राने नवीन पोस्टमध्ये सिलिकॉन स्तनही दाखवले जे शस्त्रक्रियेनंतर तिच्या स्तनातून काढले गेले. ही पोस्ट शेअर करताना ती म्हणाली, ‘सिलिकॉन मुक्त. आता काळजी आणि पुनर्प्राप्तीच्या मार्गावर. हे माझे स्तन इम्प्लांट आहे ज्याचे वजन 825 ग्रॅम होते. आता खूप हलके वाटत आहे.’

शर्लिनने काढले ब्रेस्ट इम्प्लांट

शर्लिन चोप्राने या पोस्टशिवाय एक व्हिडीओही शेअर केला. या व्हिडीओत ती सांगताना दिसत आहे की, एका स्तनात 825 ग्रॅम सिलिकॉन होते. आपल्या शरीराशी खेळू नका. माझ्या मते, आयुष्यात कोणत्याही प्रकारचा भार घेऊन चालणे आवश्यक नाही. हे पूर्णपणे माझे स्वतःचे मत आहे. प्रत्येकाचे स्वतःचे मत असू शकते. त्या सर्व डॉक्टरांचे आभार ज्यांनी माझ्या या प्रवासात मदत केली.

का घेतला निर्णय?

याआधी शर्लिन चोप्राने रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती सांगत होती की, 2023 मध्ये तिने चेहऱ्यावरील फिलर्स पूर्णपणे काढून टाकले होते. आता वेदनांमुळे तिने ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तिला गेल्या काही काळापासून पाठदुखी, छातीत दुखणे, खांदे दुखणे आणि छातीत जडपणा जाणवत होता. अनेक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांनी ही रिमूवल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.