सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत जहीर इक्बाल याने केले भर कार्यक्रमात असं कृत्य, खुर्चीहून थेट..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सतत चर्चेत असणारे नाव आहे. सोनाक्षीची जबरदस्त फॅन फॉलोइंग असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यामध्येच सोनाक्षी सिन्हा हिचा एक व्हिडीओ तूफान चर्चेचा विषय बनला.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी हिने लग्नानंतर पहिल्यांदाच काही गोष्टींवर भाष्य केले. जहीर इक्बाल याच्या कुटुंबासोबत नेमके कसे नाते आहे हे देखील तिने सांगितले. सोनाक्षी लग्नानंतर बाहेर स्वतंत्र नाही तर जहीर इक्बाल याच्या कुटुंबासोबतच राहते. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर एकमेकांसोबत खास वेळ घालवतात. बऱ्याचदा त्यांचे धमाकेदार व्हिडीओ व्हायरल होतात. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर जहीरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन वर्ष तिने आपल्या नात्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. विशेष म्हणजे जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांची लव्ह स्टोरीही एखाद्या चित्रपटातील स्टोरी सारखीच आहे. पहिल्याच भेटीमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी होणाऱ्या टीकेवर बोलताना स्पष्ट म्हटले की, माझी मुलगी आनंदी तर मीही आनंदी. तिचा आनंद माझ्या आयुष्यात महत्वाचा आहे. जहीर आणि सोनाक्षी दोघेही एकमेकांना खूप जास्त मानतात. बऱ्याचदा सोनाक्षी सिन्हा ही थेट सोशल मीडियावर जहीर इक्बाल याच्यासोबतचे रोमांटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. त्यामध्येच सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये थेट सार्वजनिक ठिकाणी जहीर हा सोनाक्षीची किस घेत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये जहीर इक्बाल याने असे काही केले की, ज्याची साधी कल्पनाही कोणी करणार नाही. व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल एका कार्यक्रमात पोहोचले. सोनाक्षी जहीर इक्बाल याच्यापासून थोडी दूर बसली. कार्यक्रम सुरू असताना अचानक जहीर इक्बाल उठतो आणि थेट सोनाक्षी सिन्हा हिच्याजवळ जातो तिला गुलाबाचे फुल देतो आणि तिला भेटून थेट किस घेण्यास सुरूवात करतो.
View this post on Instagram
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. भर कार्यक्रमात सोनाक्षी आणि जहीर इक्बाल किस घेताना दिसले आहेत. उपस्थित लोकांनाही यावेळी काही सूचत नाही. सोनाक्षी सिन्हाही काही वेळ शॉक झाल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचा हा व्हिडीओ पाहून काही लोक त्यांच्यावर टीका करताना देखील दिसत आहेत.
