सोनाक्षी सिन्हा हिने लग्नाच्या अगोदर केली आई वडिलांसोबत मिळून पूजा, पंडितजी म्हणाले, नवरदेव नवरी…

सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही लवकरच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करतंय. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या मेंहदीचे फोटोही व्हायरल झाले. झहीरच्या नावाची मेंहदी सोनाक्षीने लावलीये.

सोनाक्षी सिन्हा हिने लग्नाच्या अगोदर केली आई वडिलांसोबत मिळून पूजा, पंडितजी म्हणाले, नवरदेव नवरी...
Sonakshi Sinha
| Updated on: Jun 23, 2024 | 12:30 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे मोठ्या संपत्तीची मालकीन सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसते. सोनाक्षी सिन्हा ही अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करतंय. मध्यंतरी चर्चा होती की, सोनाक्षीच्या लग्नाला पालकांचा विरोध आहे.

आता सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच आई आणि वडिलांसोबत मिळून लग्नाच्या अगोदर पूजा केलीये. विधी विधान पूजा करताना सोनाक्षी सिन्हा दिसलीये. याचे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. पूजा करून रामायण बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर पंडितजीला पापाराझी यांनी अनेक प्रश्न केले.

यावर पंडितजी म्हणाले की, नवरदेव आणि नवरीला आर्शिवाद दिले. यावेळी पापाराझी हे लग्नाबद्दल पंडितजीला विचारताना दिसले. त्यावर पंडितजींनी उत्तर देणे टाळले. तुम्हाला स्वत: सर्व माहिती होईल, असे ते म्हणाले. पूजेबद्दल बोलताना पंडितजी म्हणाले की, सर्वकाही ठिक राहिले. पूजेनंतर सोनाक्षी सिन्हा हिने पापाराझी यांच्याकडे पाहून फोटोसाठी पोझ दिली.

यावेळी सोनाक्षी सिन्ही ही ब्लू रंगाच्या सूटमध्ये दिसली. लग्नाचा ग्लो सोनाक्षी सिन्हा हिच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला. सोनाक्षी सिन्हा हिला झहीर इक्बाल याच्या नावाची हळद देखील लागलीये. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठे भाष्य केले होते. आता सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या रामायण बंगल्यावर पाहुण्यांची ये-जा सुरू झालीये.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे हिंदू किंवा मुस्लिम पद्धतीने लग्न करणार नाहीत. सोनाक्षी आणि झहीर सिव्हिल मॅरेज करणार आहेत. त्यानंतर सर्वांसाठी एका पार्टीचे आयोजन केले जाईल. शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट म्हटले होते की, सोनाक्षीचा कोणताही निर्णय असेल त्या निर्णयात मी तिच्या मागे 100 टक्के उभा असेल. कारण ती योग्यच निर्णय घेईल.