AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून मोठा खुलासा, म्हणाली, झहीर इक्बाल याच्याबद्दल घरी…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच सोनाक्षी सिन्हा दिसते.

सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून मोठा खुलासा, म्हणाली, झहीर इक्बाल याच्याबद्दल घरी...
sonakshi sinha
| Updated on: Jul 19, 2024 | 2:52 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 23 जुन 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्न केले. सात वर्ष यांनी एकमेकांना डेट केल्यानतंर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. मोठ्या संपत्तीची मालकीन देखील सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते, आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सोनाक्षी सिन्हा कायमच दिसते. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात अनेक मोठे बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले होते.

सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसलीये. सोनाक्षी सिन्हा हिने सांगितले की, पहिल्यांदा ज्यावेळी तिने तिच्या घरी झहीर इक्बाल याच्याबद्दल सांगितले, त्यावेळी तिच्या घरच्यांची प्रक्रिया कशी होती. या मुलाखतीवेळी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत झहीर इक्बाल हा देखील उपस्थित होता.

सोनाक्षी सिन्हाने म्हटले की, मी वडिलांना माझ्या आणि झहीरबद्दल ज्यावेळी सांगत होते, त्यावेळी मी प्रचंड घाबरले. सर्व सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याचा विचार करूनच मला भिती वाटत होती. मला सर्व गोष्टी खूप व्यवस्थित आणि चांगल्याप्रकारे सांगायच्या होत्या. मी वडिलांना म्हटले की, तुम्हाला माझ्या लग्नाची काळजी वाटत नाही का? कारण तुम्ही मला याबद्दल काहीही विचारले नाही.

यावर माझे वडील (शत्रुघ्न सिन्हा) म्हणाले, मी तुझ्या आईला यावर विचारायला सांगितले होते. यावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, माझ्या आयुष्यात झहीर नावाचा मुलगा आहे. यावर ते म्हणाले की, होय मी याबद्दल वाचले होते. मुले मोठी आहेत…नवरा बायको राजी असतील तर काजी काय करणार? असे ते म्हणाले. 

मला त्यादिवशी कळाले की, माझे वडील किती जास्त शांत आहेत. मी विचार केला की, अरे हे इतके जास्त सोपे होते…माझ्या वडिलांमुळे मला मोठा आधार मिळाल्याचे देखील सोनाक्षी सिन्हा हिने सांगितले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर तिचे भाऊ नाराज असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर लव आणि कुश यांनी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत कायमचे नाते तोडल्याचेही सांगितले जाते.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?