AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाली बेंद्रे – पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्या अफेअरच्या चर्चा, अनेक वर्षांनंतर क्रिकेटरने सोडलं मौन

Sonali Bendre and Pakistani Cricketer Shahid Afridi: सोनाली बेंद्रे - शाहिद आफ्रिदी एकेकाळी होते रिलेशनशिपमध्ये? अनेक वर्षांनंतर पाकिस्तानी क्रिकेटरचा मोठा खुलासा..., अनेक वर्षांनंतर पुन्हा दोघांच्या नात्याची चर्चा...

सोनाली बेंद्रे - पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्या अफेअरच्या चर्चा, अनेक वर्षांनंतर क्रिकेटरने सोडलं मौन
| Updated on: Dec 13, 2024 | 11:09 AM
Share

Sonali Bendre and Pakistani Cricketer Shahid Afridi: झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते. आता सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींना त्यांच्या खास व्यक्तीसोबत स्पॉट केलं जातं. पण पूर्वी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नसायचं. दरम्यान, 90 च्या दशकातील एक काळ असा देखील होता जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. पण दोघांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही.

आता अनेक वर्षांनंतर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे हिच्यासोबत असलेल्या नात्यावर शाहिद याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहिद याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. आर्ट्स काउंसिल कराचीसोबत झालेल्या मुलाखतीत क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलं आहे.

मुलाखतीत शाहिद याला विचारण्यात आलं की, ‘आम्ही असं ऐकलं आहे की, सोनाली बेंद्रेला तू फार आवडायचा… यामध्ये काही तथ्य आहे, की तुमच्यात फक्त मैत्री होती…’ यावर आफ्रिदी याने लक्षवेधी उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहिद यांने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘तुम्ही मला आता मला आजोबा म्हणालात आणि आजोबांबद्दल चर्चा करत आहात… ते सर्वकाही आता डिलीट करा… आता आपण मोठे झालो आहोत…’ असं म्हणत क्रिकेटरने सोनाली सोबत असलेल्या नात्यावर बोलणं टाळलं…

सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण सोनाली आणि शाहिद यांनी कधीच दोघांच्या नात्यावर मौन सोडलं नाही. आता दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.

सोनाली हिने निर्माता गोल्डी बहल याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. अभिनेत्री कायम पती आणि मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता सोनाली बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

शाहिद आफ्रिदी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटरने नादिया आफ्रिदी हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना चार मुलं देखील आहेत. शाहिद सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहिद त्यााच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चाहत्यांना सांगत असतो.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत