AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंचायत’ फेम ‘दामाद दी’ने गुपचूप उरकलं लग्न, बायकोसोबत फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला…

Panchayat fame Aasif Khan Marriage: 'पंचायत' फेम 'दामाद दी'ने उरकलं लग्न, लग्नाचे फोटो तुफान व्हायरल, बायकोसोबत फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा...

'पंचायत' फेम 'दामाद दी'ने गुपचूप उरकलं लग्न, बायकोसोबत फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला...
| Updated on: Dec 13, 2024 | 8:47 AM
Share

Panchayat fame Aasif Khan Marriage: सध्या झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसोबत लग्न केलं आहे. ‘पंचायत’ फेम दामाद जी म्हणजे अभिनेता आसिफ खान देखील लग्नबंधनात अडकला आहे. ‘पंचायत’ सीरिजमध्ये आसिफ याने गणेश या भूमिकेला न्याय दिला. चाहत्यांनी देखील अभिनेत्याला डोक्यावर घेतलं. आता असिफ त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आसिफ याने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. सध्या अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

33 वर्षीय आसिफ खान याने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेता बायकोवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. लग्नात आसिफ याने क्रिम रंगाची शेरवानी आणि पघडी घातली होती. तर अभिनेत्याच्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आसिफ याने कॅप्शनमध्ये ‘कबूल है…’ असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aasif Khan (@aasifkhan_1)

सध्या आसिफ याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 10 डिसेंबर रोजी आसिफ याचं लग्न पार पडलं आहे. फोटोंवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मौनी रॉय शुभेच्छा देत म्हणाली, ‘तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा… सॉरी मी येऊ शकली नाही…’ सुयेश रॉय कमेंट करत म्हणाला, ‘मुबारक हो भाई…’

आसिफ कधी हॉटेलमध्ये करायचा काम

एका मुलाखतीत आसिफ याने आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं होतं. करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अभिनेता हॉटेलमध्ये काम करायचा… त्याच हॉटेलमध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान याने 2012 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी आसिफ याने मॅनेजरला बॉलीवूड सेलिब्रिटींना भेटण्याची परवानगी देण्यास सांगितलं होतं. पण त्याने स्पष्ट नकार दिला. त्या दिवशी अभिनेता खूप रडला.

अखेर आसिफ याने 2011 मध्ये अभिनयास सुरुवात केली. अभिनेत्याने ‘रेड्डी’ सिनेमात ज्यूनियर अभिनेत्याची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर अभिनेता ‘अग्निपथ’, ‘परी’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’, ‘पगलॅट’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि ‘काकुड़ा’ सिनेमात दिसला. आसिफ याने अनेक वेबसीरिजमध्ये देखील काम केलं आहे. ‘मिर्झापूर’, ‘जामतारा’, ‘पंचायत’, ‘पाताल लोक’, ‘मिर्झापूर 2’ या वेब सीरिजमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.